Gujarat local body election results 2026 BJP wins three civic bodies saam tv
देश विदेश

CJP आणि काँग्रेसच्या आंदोलनादरम्यान भाजपला मिळाली खूशखबर; तीन ठिकाणी दणदणीत विजय

Gujarat Civic Election Results: गुजरातमधील गांधीनगर, थारा आणि ओखा या तीन स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपने सत्ता कायम राखलीय. गांधीनगरमध्ये भाजपला ३८, काँग्रेसला ५ जागा मिळाल्या, तर आम आदमी पार्टीला एकही जागा जिंकता आली नाही.

Bharat Jadhav

  • तीन नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपने सत्ता कायम राखली.

  • गांधीनगर महानगरपालिकेच्या ४४ जागांपैकी भाजपने ३८ जागा जिंकल्या.

  • गांधीनगरमध्ये काँग्रेसला ५ जागा मिळाल्या, तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी

दिल्लीसह अनेक राज्यात निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन चालू आहे. या आंदोलनाच्या अडून कॉक्रोच जनता पार्टी आणि काँग्रेस भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. विविध ठिकाणी भाजपविरोधात आंदोलन होत असतानाच भाजपला खूशखबर मिळालीय. तर काँग्रेससह आम आदमी पार्टीला जोरदार धक्का बसलाय. गुजरातमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपनं दणदणीत विजय मिळवलाय.

भाजपविरोधात विरोधक मोर्चेबांधणी करत आहेत, त्याचदरमयान गुजरातच्या तीन शहरातील नगरपालिकांमध्ये भाजपने पुन्हा एकदा सत्ता मिळवलीय. तर काँग्रेसचा दारुण पराभव झालाय. गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपविरोधात दंड थोपटणाऱ्या 'आम आदमी पक्षा'ला (आप) आपलं साधं खातेही उघडता आलं नाहीये.

गांधीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकांचा निकाल आज मंगळवारी जाहीर झाले. सकाळी ९ वाजता या तिन्ही शहरी संस्थांसाठी मतमोजणी सुरू झाली. महानगरपालिकेच्या ४४ जांगासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपनं ३८ जागांवर दणदणीत विजय मिळवलाय. या विजयासह भाजपनं थारा आणि ओखा नगरपालिकेत आपली सत्ता कायम ठेवलीय. गांधीनगर महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसनं पाच जागा मिळल्या.

तर एक जागेवर अपक्ष उमेदवारानं बाजी मारलीय. भाजपची कट्टरविरोधक असलेले आम आदमी पक्षाला या निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नाही. मागे झालेल्या GMC निवडणुकीत या पक्षाने एक जागा जिंकली होती. GMC ची मागील निवडणूक ऑक्टोबर २०२१ मध्ये झाली होती त्यात भाजपने ४४ पैकी ४१ जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेसने दोन आणि 'आप'ला एक जागा जिंकता आली होती.

बनासकांठा जिल्ह्यातील थारा नगरपालिकेत भाजपने २४ पैकी १९ जागा जिंकल्या. तर काँग्रेसने उर्वरित पाच जागा मिळवल्या. देवभूमी द्वारका जिल्ह्यातील ओखा नगरपालिकेत भाजपने लढवलेल्या ३२ जागांपैकी २९ जागा जिंकल्या, तर काँग्रेसने तीन जागा जिंकल्या.

ओखा येथील चार जागांसाठीचे उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. कारण या जागांसाठी केवळ भाजपचेच उमेदवार रिंगणात होते. या चार जागांसह भाजपने एकूण ३६ नगरपालिका जागांपैकी ३३ जागा जिंकल्या. रविवारी झालेल्या निवडणुकांनंतरच्या या निकालांमुळे तिन्ही शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांवरील भाजपचे वर्चस्व कायम राहिलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सावधान! तुमचा कॉल डिटेल रेकॉर्ड विकला जातोय; पोलिसांचाच हात असल्याच्या दाव्याने खळबळ

Crime News: महिला पोलिसाचा संशयास्पद मृत्यू, पोलिस असणाऱ्या नवऱ्याला अटक; नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Update : सोनसरी आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी कारवाई; अधीक्षिका निलंबित करण्याचे आदेश

Shivsena : शिवसेना कुणाची? सुनावणी पुन्हा लांबणीवर; कारण आले समोर

भाजपच्या 100 नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस; पक्षात खळबळ

SCROLL FOR NEXT