Gujarat Crime Saam tv
देश विदेश

Crime: अनैतिक संबंधातून नवऱ्यासोबत कडाक्याचे भांडण, महिलेने ३ मुलांची हत्या केली; नंतर...

Gujarat Crime: गुजरातमध्ये एका महिलेने आपल्या ३ मुलांची हत्या केली. त्यानंतर तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे गुजरात हादरले आहे. पोलिस तपास करत आहेत.

Priya More
  • गुजरातच्या वलसाडमध्ये आईने ३ मुलांची हत्या केली

  • मुलांच्या हत्येनंतर आईचा आत्महत्येचा प्रयत्न

  • विवाहबाह्य संबंधातून घडली तिहेरी हत्याकांडाची घटना

  • कौटुंबिक वादातून मुलांची हत्या

गुजरातमध्ये भयंकर हत्याकांडाची घटना घडली. महिलेने आपल्या ३ मुलांची हत्या करून नंतर आत्महत्येचा प्रयत्न केला. महिलेची प्रकृती गंभीर असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे गुजरातमध्ये खळबळ उडाली आहे. महिलेच्या अनैतिक संबंधाबद्दल नवऱ्याला कळाले होते. यावरून दोघांमध्ये सतत वाद होत होता. या वादातूनच महिलेने टोकाचे पाऊल उचलले.

मिळालेल्या माहितीनुसार, महिलेने आधी आपल्या तिन्ही मुलांना विष पाजले त्यानंतर त्यांची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर महिलेने स्वतः विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महिलेचे विवाहबाह्य संबंध होते. तिच्या नवऱ्याला याबद्दल कळाल्यावर दोघांमध्ये वाद सुरू होते. रोज यावरून दोघांमध्ये भांडण व्हायचे.

घटनेच्या रात्री महिला आणि तिच्या नवऱ्यामध्ये याच मुद्द्यावरून भांडण झाले. महिलेच्या नवऱ्याने तिला फोनवर कुणाशी तरी बोलताना पाहिले होते. त्यानंतर दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. महिलेच्या नवऱ्याने सांगितले की, तो जेव्हा झोपला त्यानंतर तिने आपल्या तीन मुलांची हत्या केली त्यानंतर स्वत: विष प्यायली. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा कुटुंबातील सदस्य उठले तेव्हा ही घटना घडकीस आली.

वलसाडचे उपअधीक्षक जे. के. पटेल यांनी सांगितले की, एका महिलेने आपल्या मुलांची हत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. महिलेने आपल्या तीन मुलांना विष देऊन त्यांची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर तिने स्वतःही ते विष प्यायले. ही घटना नवरा- बायकोतील कौटुंबिक वादानंतर घडली. नवऱ्याला बायकोच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल कळाले होते. ज्यामुळे दोघांमध्ये जोरदार वाद झाला. या वादानंतर महिलेने हे भयंकर कृत्य केले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिन्ही मुलांचे मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी आरोपी महिलेवर तीन मुलांच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ती महिला सध्या रुग्णालयात असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. ती शुद्धीवर आल्यानंतर पुढील तपास केला जाईल. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Operation Tiger: ४ वर्षांनंतर पुन्हा राजकीय भूकंप, ठाकरेसेनेचे ६ खासदार शिंदेसेनेच्या वाटेवर; वाचा'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शुक्रवारी ब्लॉक, पर्यायी मार्ग काय? जाणून घ्या

Pune University: मोठी बातमी! पुणे विद्यापीठाच्या मेसचा परवाना रद्द, तुकाराम मुंढेंची धडक कारवाई

वैभव सूर्यवंशीवर कारवाईचा बडगा; सामन्याच्या मानधनात तब्बल 50 टक्के कपात, अचानक नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Update: हिंगोलीत ठाकरेंचे शिवसैनिक आक्रमक

SCROLL FOR NEXT