Gujarat Accident Saam tv
देश विदेश

Accident: भरधाव बसची दुचाकीला धडक, एका कुटुंबातील चौघांसह ५ जणांचा मृत्यू

Gujarat Accident: गुजरातमध्ये भीषण रस्ते अपघात झाला. बसने दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये ५ जणांचा जागीच मृत्यू झाला.

Priya More

गुजरातमध्ये भीषण रस्ते अपघातामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला. गुजरातच्या अमरेली जिल्ह्यातील अमरेली -सावरकुंडला महामार्गावर ही घटना घडली. शेत्रुंजी नदीजवळ भरधाव बसने दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर २ जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताचा तपास पोलिस करत आहेत.

अमरेली-सावरकुंडला रस्त्यावर राज्य परिवहन महामंडळाची बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या नवरा-बायको आणि दोन मुलांचा जागीच मृत्यू जाला. तर बसचालकाचा देखील या अपघातामध्ये मृत्यू झाला. दुचाकीला धडक दिल्यानंतर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात कोसळली.

पती आणि त्यांची दोन लहान मुले यांचा जागीच मृत्यू झाला, तर अपघातात जखमी झालेल्या एसटी बस चालकाचाही मृत्यू झाला. गोगन सोलंकी (३७ वर्षे), हिराल (३५ वर्षे), त्यांचा मुलगा नितीन आणि सहा महिन्यांची मुलगी ध्रुती यांचा जागीच मृत्यू झाला. तर बसचालक मेहुलचा देखील अपघातामध्ये मृत्यू झाला. या अपघातानंतर लगेचच स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी सर्व मृत आणि जखमींना अमरेली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले. या ठिकाणी जखमी झालेल्या दोघांवर उपचार सुरू आहेत.

सोळंकी कुटुंबीय दुचाकीवरून सावरकुंडलाच्या दिशेने जात असताना ही भयंकर घटना घडली. घटनेची माहिती मिळताच, राज्य परिवहन महामंडळाचे डेपो व्यवस्थापक आणि स्थानिक पोलिसांचे एक पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अमरेली पोलिसांनी अपघाताच्या कारणांचा तपास सुरू केला आहे. या दुःखद घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Result : पंचायत समिती निवडणुकीत भाजपला मोठा धक्का; काँग्रेसची जोरदार मुसंडी; 2,990 जागांवर विजय

Aadhaar Verification : ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा! आधार कार्डची पडताळणी आता घरबसल्या होणार; लगेच जाणून घ्या प्रोसेस

Maharashtra News Live Update: नाशिकमधील नामांकित मिसळ हॉटेल्सवर FDA ची धडक कारवाई

लग्नात घेण्यासाठी 5 सोपे मराठी उखाणे

Post Office Rules 2026 : पोस्ट ऑफिस खातेधारकांसाठी नवा नियम! तुमच्या पैशांवर काय परिणाम होणार? वाचा अपडेट्स

SCROLL FOR NEXT