

हरिद्वार येथे गंगा स्नान करण्यासाठी निघालेल्या ६ जिवलग मित्रांवर काळाने घाला घातला. सोमवती आमवस्येला हे तरुण एका कारमधून हरिद्वारच्या दिशेने निघाले पण वाटेतच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. भरधाव कार अनियंत्रित होत डिव्हायडरला धडकली. त्यानंतर ही कार विरुद्ध दिशेच्या रस्त्यावर जाऊन उलटली आणि पेट घेतला. या भीषण आगीमुळे कारमध्ये असलेल्या सहाही तरुणांचा होरपळून मृत्यू झाला. कारमधील सहाही तरुण जिवंत जळाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताची ही घटना ९ नोव्हेंबरला पहाटे ५ वाजताच्या सुमारास मुजफ्फरनगर महामार्गावर घडली. मुजफ्फरनगरचे एसएसपी सूरज कुमार राय यांनी सांगितले की, पोलिसांना माहिती मिळाली होती की, हरियाणाच्या पानीपतवरून येणाऱ्या कारला अपघात झाला. कारमधून ६ तरुण प्रवास करत होते.
जग्गाहेडी टोलनाक्यानंतर उड्डाणपुलावर भरधाव कार अनियंत्रित झाली. कारने आधी डिव्हायडरला धडक दिली त्यानंतर ही कार विरुद्ध दिशेच्या लेनवर जाऊन रस्त्यावर उलटली. त्यानंतर या कारने पेट घेतला. बघता बघता कार आगीचा गोळा बनली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ आग विझवली आणि कारमध्ये असलेल्या सहाही तरुणांना गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात नेले. पण या सहाही तरुणांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले.
हे सहाही तरुण जिवलग मित्र होते. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबीय आणि ते राहत असलेल्या गावावर शोककळा पसरली. या अपघातामध्ये साहिल (२० वर्षे), अमन (२१ वर्षे), अंकित (२१ वर्षे), राहुल (२३ वर्षे) यांच्यासह सहा जणांचा मृ्त्यू झाला. यातील काही तरुण शिक्षण घेत होते तर काही नोकरी करत होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.