Delhi Kashmere Gate hit and run accident latest news : राजधानी दिल्लीच्या कश्मीरी गेट परिसरातील युधिष्ठिर सेतूवर मध्यरात्री भयंकर अपघात झाला. भरधाव कारने आधी एका ऑटो रिक्षाला जोरात धडक दिली. त्यानंतर थांबण्याऐवजी पळून जाण्याच्या नादात चालकाने आणखी ६ जणांना उडवले. या अपघातातील एकूण ८ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान २ जणांचा मृत्यू झाला आहे. घटनेनंतर फरार झालेल्या चालकाचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. या प्रकरणात आता एफआयआरमध्ये कलम १०८ देखील वाढवण्यात आले आहे.
१८ नोव्हेंबरच्या मध्यरात्री उत्तर दिल्लीत भरधाव वेगाने येणाऱ्या एसयूव्हीने ऑटोरिक्षाला जोरात धडक दिली. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आणि सहा जण जखमी झाले, अशी माहिती दिल्ली काश्मिरी गेट पोलिसांनी दिली. मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात आठ जण जखमी झाले होते. सुरुवातीला भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम २८१ आणि १२५(अ) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला होता. पण जखमींपैकी दोघांचा उपचारावेळी मृत्यू झाला, त्यानंतर या प्रकरणात बीएनएसचे कलम १०५ जोडण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांकडून तपास सुरू केला आहे. अपघातानंतर आरोपींनी पळ काढला आहे. त्याची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. आरोपी चालक अद्याप पकडला गेलेला नाही. तो फरार आहे. पोलीस त्याला पकडण्याचे प्रयत्न करत आहेत.
कार अतिशय भरधाव वेगात जात होती. त्याच वेगाने कारने पुलावर एका ऑटोरिक्षाला जोरात धडक दिली. ऑटोरिक्षाला धडक दिल्यानंतर चालकाने थांबण्याऐवजी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्या भरधाव कारने आणखी ६ लोकांना चिरडले. या अपघातात ऑटोमधील २ आणि इतर सहाजण जखमी जाले. अपघातानंतर सर्व आठ जणांना रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू होते, परंतु दोघांना वाचवता आले नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.