अभिजित सोनवणे, नाशिक प्रतिनिधी
Imtiaz Jaleel Gets Bail in Nashik TCS Case: नाशिकमधील टीसीएस (TCS) मधील धर्मांतरण आणि महिला कर्मचाऱ्यांच्या शोषण प्रकरणात एमआयएम (MIM) नेते इम्तियाज जलील यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयाने त्यांना ५० हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.
टीसीएस प्रकरणातील प्रमुख आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याचा आरोप इम्तियाज जलील यांच्यावर आहे. याच कारणावरून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांनाही या प्रकरणात आरोपी करण्यात आले होते.
आज नाशिकच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने जलील यांच्या जामिनाला तीव्र विरोध दर्शवला. मात्र, न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर इम्तियाज जलील यांचा जामीन अर्ज मंजूर केला.
मुख्य संशयित आरोपी निदा एजाज खान हिला पसार काळात छत्रपती संभाजीनगरात (Chhatrapati Sambhajinagar) विविध हॉटेल्स, खोल्या आणि स्वतंत्र घरांमध्ये लपवून ठेवण्यात आल्याचा उलगडा विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) (SIT) तपासात झाला होता. निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरातून नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पडद्यामागे वेगाने हालचाली घडल्याचे तपासात निष्पन्न झाले होता. यावेळी एमआयएमचे नगरसेवक संशयित मतीन पटेल आणि माजी खासदार संशयित इम्तियाज जलील यांच्यात झालेला संवाद पोलिसांच्या हाती लागला होता. जलील यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला होता. या प्रकऱणात त्यांना आज कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.