

हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात सहा मित्रांचा अपघाती मृत्यू
लाडभरोल परिसरात कार खोल दरीत कोसळून भीषण अपघात
मृतांपैकी बहुतांश जण अल्पवयीन असल्याची प्राथमिक माहिती
हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात एक भीषण रस्ते अपघात घडला. एक कार खोल दरीत कोसळसून झालेल्या अपघातात सहा तरुणांचा मृत्यू झालाय. हा अपघात जोगिंदरनगर उपविभागातील लाडभरोल परिसरात घडला. ही घटना काल रात्री घडली असली, तरी त्याबद्दलची माहिती आज समोर आलीय. प्राथमिक अहवालांनुसार, मृतांपैकी बहुतांश जण अल्पवयीन आहेत.
अपघातात प्राण गमावलेल्या सहा तरुणांची ओळख पटलीय. यामध्ये सिमास गावचे यास राय (रामलाल यांचा मुलगा) आणि आयुष (विनोद कुमार यांचा मुलगा) यांचा समावेश आहे. तसेच, गवाला गावचे रहिवासी असलेले पंकज (पराक्रम सिंग यांचा मुलगा) आणि अर्णव (नरेंद्र कुमार यांचा मुलगा) यांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे.
यासह बालतू गावचे रहिवासी अजय कुमार यांचा मुलगा आदित्य आणि सिमास गावचे रहिवासी नवीन राय यांचा मुलगा नुजू यांचाही या अपघातात मृत्यू झालाय. या सहा तरुणांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला. गावांमध्ये शोककळा पसरलीय.
मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री लाडभरोल परिसरात एक कार खोल दरीत कोसळली. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. ही घटना रात्री घडल्यामुळे ती लगेच कोणाच्या लक्षात आली नाही; मात्र बुधवारी आज दुपारी ही बाब उघडकीस आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आलीय. डीएसपी पधार, लोकेंद्र नेगी यांनी या अपघाताला दुजोरा दिलाय. त्यांनी सांगितले की, या घटनेत सहा तरुणांचा मृत्यू झाला आहे. पोलीस अपघाताच्या कारणांचा तपास करत असून, कार दरीत कशी कोसळली, याचाही शोध घेतला जातोय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.