नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर कार आणि दुचाकीचा भीषण अपघात
कारच्या धडकेत २ जणांचा मृत्यू
जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु
नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर येवला तालुक्यातील अंदरसूलजवळ दुचाकी आणि कारच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. अंदरसूल येथील हॉटेल स्वामीजवळ हा अपघात घडला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीवरील तिघे वैजापूर येथून येवल्याच्या दिशेने प्रवास करत होते. दरम्यान, अंदरसूल येथील हॉटेल स्वामीजवळ त्यांच्या दुचाकीला भरधाव कारने जोरदार धडक दिली. या धडकेमुळे दुचाकीवरील तिघेही गंभीर जखमी झाले. अपघाताची तीव्रता लक्षात घेता घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली.
अपघाताची माहिती मिळताच आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना मदत करत उपचारासाठी येवला येथील शासकीय रुग्णालयात हलवण्याची व्यवस्था केली. मात्र, रुग्णालयात नेत असताना एका जखमीचा रस्त्यातच मृत्यू झाला. अन्य जखमींवर वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले. त्यापैकी एका गंभीर जखमीची प्रकृती लक्षात घेऊन त्याला पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आले आहे.
या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. महामार्गावरून प्रवास करताना वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून वाहतुकीचे नियम पाळावेत, असे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, याचा शोध पोलीस घेत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.