Sleep Health : झोपेत अचानक उंचीवरून पडल्यासारखा झटका बसतोय? 'या' गंभीर कारणाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका

Alisha Khedekar

झोपेत झटका का येतो?

झोप लागताना अचानक उंचीवरून पडल्यासारखे वाटणे आणि शरीराला झटका बसणे याला हायपनिक जर्क म्हणतात.

Sleep Health | Google

हे सामान्य आहे का?

असे झटके अनेकांना येतात. बहुतेक वेळा ही सामान्य शारीरिक प्रतिक्रिया असते आणि घाबरण्याची गरज नसते.

Sleep Health | Google

तणावाचा परिणाम

मानसिक तणाव आणि चिंता वाढल्यास झोपेच्या सुरुवातीला असे झटके येण्याची शक्यता वाढू शकते.

Sleep Health | Google

अपुऱ्या झोपेचा धोका

रोज उशिरा झोपणे किंवा पुरेशी विश्रांती न मिळाल्याने झोपेतील झटके अधिक जाणवू शकतात.

Sleep Health | Google

कॅफिनचे अतिसेवन

चहा, कॉफी किंवा एनर्जी ड्रिंक्समधील कॅफिनमुळे झोपेवर परिणाम होऊन असे झटके वाढू शकतात.

Sleep Health | Google

झटके कमी करण्यासाठी काय कराल?

नियमित झोपेची वेळ ठेवा, तणाव कमी करा, कॅफिन मर्यादित करा आणि झोपण्यापूर्वी मोबाईलचा वापर कमी करा.

Sleep Health | Google

टीप

सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

Sleep Health | Google

NEXT : रात्रीचे जेवण आणि झोपण्यामध्ये किती अंतर असावे?

Healthy Dinner Tips Eating BetterSleep | AI Image
येथे क्लिक करा