

जेष्ठ नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहेत. आता विदर्भात आधार कार्डाच्या पडताळणीसाठी जेष्ठ नागरिकांना सरकारी कार्यालयात जाण्याची किंवा रांगेत उभं राहण्याची गरज नसेल. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण म्हणजेच UIDAI कडून भारतीय टपाल विभागाकडे घरपोच आधार व्हेरिफिकेशनची जबाबदारी सोपवण्यात आली. या उपक्रमामुळे विदर्भातल्या २२ हजारांपेक्षा जास्त जेष्ठ नागरिकांना मोठा दिवाला मिळणार आहे.
या मोहिमेची सुरुवात नागपूरमधून प्रोयोगिक तत्त्वावर करण्यात आली आहे. त्यानंतर संपूर्ण विदर्भात ही मोहीम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत पोस्टमन आणि टपाल विभागाचे अधिकारी थेट जेष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन आधार पडताळणी करणार आहेत.
तर या प्रोसेसमध्ये संबंधित जेष्ठ नागरिक हयात आहेत का, तसेच आधार कार्डावरचा फोटो आणि माहिती प्रत्यक्ष व्यक्तीशी जुळते का, याची खातरजमा केली जाईल. तसेच ज्या जेष्ठ नागरिकांकडे आधार कार्ड नाही, त्यांची उपलब्ध वैध कागदपत्रांच्या आधारे घरपोच आधार नोंदणीही केली जाईल. या सेवेसाठी जेष्ठ नागरिकांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना आधी संपर्क केला जाईल. त्यानंतर त्यांच्या सोयीच्या वेळेनुसार अपॉइंटमेंट निश्चित करून टपाल विभागाचे कर्मचारी घरी भेट देतील. त्यामुळे वृद्ध, आजारी किंवा घराबाहेर जाण्यास अडचण असलेल्या नागरिकांना मोठी मदत होणार आहे.
जेष्ठ नागरिकांना या उपक्रमांतर्गत अमरावतीत १० शतायुषी नागरिकांचे आधार कार्ड तयार करण्यात आले आहेत. घरपोच सेवा उपलब्ध झाल्यामुळे शंभर वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांनाही आधारसंबधित प्रोसेस पूर्ण करणं सोपं होणार आहे.
डाक सेवा विदर्भ रिजनचे संचालक डॉ. सुधीर जाखेरे यांनी या उपक्रमाची माहिती दिली. जेष्ठ नागरिकांची गैरसोय टाळून त्यांच्या सोयीच्या वेळेनुसार सेवा देणे, हा या मोहिमेमागचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे विदर्भातले हजारो जेष्ठ नागरिकांना आता घरबसल्या आधार पडताळणीची सुविधा मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.