Post Office Rules 2026 : पोस्ट ऑफिस खातेधारकांसाठी नवा नियम! तुमच्या पैशांवर काय परिणाम होणार? वाचा अपडेट्स

POSB CBS Manual 2026 : पोस्ट ऑफिस खातेदारांसाठी २०२६ मध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. किमान शिल्लक, निष्क्रिय खातं, खाते ट्रान्सफर नॉमिनी क्लेम आणि TDS नियम जाणून घ्या.
Post Office Rules 2026
Post Office Rules 2026 latest news
Published On: 

प्रत्येकजण भविष्यात आर्थिक अडचणी येऊ नयेत म्हणून काही रक्कम गुंतवणूकीत जमा करतात. त्याच्यातून त्यांना चांगला परतावाही मिळतो. यामध्ये पोस्ट ऑफीसचा पर्याय सर्वात विश्वासू आणि उत्तम परतावा देणारा मानला जातो. आता भारतीय डाक विभागाने पोस्ट ऑफिस सेव्हिंग बँक (POSB) संदर्भात नवीन CBS मॅन्युअल २०२६ जारी केले आहे. १७ नोव्हेंबर २०२६ रोजी SB Order No. 13/2026 अंतर्गत हे निर्देश दिले. या नवीन मॅन्युअलमध्ये खातेधारकांसाठी किमान शिल्लक, निष्क्रिय खातं, खाते ट्रान्सफर, अशा महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे.

पोस्ट ऑफिसचे ६ महत्त्वाचे नियम कोणते?

१. खात्यातील शिल्लक रक्कम

पोस्ट ऑफिसच्या सामान्य बचत खात्यामध्ये किमान ५०० रुपये शिल्लक ठेवणं आवश्यक आहे. त्यामुळे खातेधारकांनी वेळोवेळी आपल्या खात्यातली शिल्लक तपासली पाहिजे.

२. व्यवहार न केल्याने खातं निष्क्रिय होऊ शकते

दीर्घकाळ खात्यात कोणताही व्यवहार केला नाही तर खातं निष्क्रिय (Dormant) होऊ शकतं. असं खातं परत सुरू करायला संपूर्ण प्रोसेस पूर्ण करावी लागू शकते.

Post Office Rules 2026
EPFO Latest Update : नोकरी सोडली तरी PF साठी वर्षभर वाट पाहावी लागणार नाही! आता फक्त 2 महिन्यांत मिळणार पैसे?

३. खाते ट्रान्सफर करताना शुल्क लागू शकते

एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये खातं ट्रान्सफर करायचं असेल तर संबंधित प्रोसेस आणि लागू शुल्काची माहिती आधी जाणून घेतली पाहिजे. तसेच महत्त्वाच्या कागदपत्रांचीही खात्री केली पाहिजे.

४. मुदतीआधी खाते बंद करण्याचे नियम

पोस्ट ऑफिसच्या वेगवेगळ्या बचत योजनांमध्ये मुदतीआधी पैसे काढायचे असतील तर त्याचे वेगवेगळे नियम आहेत. काही योजनांमध्ये ठरावीक कालावधीआधी खातं बंद करण्यावर निर्बंध किंवा अटी असू शकतात.

Post Office Rules 2026
8th Pay Commission: ₹२१,७०० बेसिक असणाऱ्यांचा पगार होणार ₹६९ हजार? ८व्या वेतन आयोगाचा मोठा अंदाज

५. खातेदाराच्या मृत्यूनंतर नॉमिनीला क्लेम करता येणार

खातेदाराचा मृत्यू झाला असेल तर नॉमिनी किंवा पात्र वारसदाराला खात्यातली रक्कम मिळवण्यासाठी क्लेम करावा लागतो. यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि प्रोसेस नवीन मॅन्युअलमध्ये स्पष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे खात्यातील नॉमिनीची माहिती अपडेट ठेवणं महत्त्वाचं आहे.

६. मोठ्या रोख व्यवहारांवर TDS चे नियम

पोस्ट ऑफिसमधून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम काढताना TDS लागू होऊ शकतो. पण प्रत्येक व्यवहारावर TDS कापला जात नाही. त्यासाठी ठरवलेली मर्यादा, खातेदाराची परिस्थिती आणि आयकर नियम विचारात घेतले जातात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.