Crime News Saam tv
देश विदेश

धावत्या एक्स्प्रेसच्या टॉयलेटमध्ये बलात्कार झाल्याचं तरुणीनं सांगितलं, पण CCTV फुटेजमुळं हादरवणारं सत्य आलं समोर

Train physical assaults Claim Turns Out False: गोरखपूरहून मुंबईला जाणाऱ्या ट्रेनमध्ये लैंगिक अत्याचाराचा आरोप. महिलेनं वॉशरूममध्ये बलात्कार झाल्याचं सांगितलं. GRP तपासात खोटा आरोप असल्याचं निष्पन्न.

Bhagyashree Kamble

  • गोरखपूरहून मुंबईला जाणाऱ्या ट्रेनमध्ये लैंगिक अत्याचाराचा आरोप.

  • महिलेनं वॉशरूममध्ये बलात्कार झाल्याचं सांगितलं.

  • GRP तपासात खोटा आरोप असल्याचं निष्पन्न – प्रियकरासोबत संबंध होते.

  • सीसीटीव्ही, वैद्यकीय अहवालाच्या आधारे सत्य समोर आलं.

प्रयागराजहून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या ट्रेनमध्ये एका महिलेसोबत लैंगिक अत्याचार घडला होता. पण या प्रकरणात आता एक वेगळं वळण समोर आलं आहे. पोलिसांच्या तपासात महिला खोटे आरोप करत असल्याचं समोर आलं. महिला प्रियकरासोबत शारीरिक संबंध ठेवल्यानंतर थेट रूग्णालयात पोहोचली होती. मात्र, तपासात वेगळीच माहिती समोर आली आहे.

नक्की प्रकरण काय?

३० वर्षीय महिलेनं चालत्या एक्स्प्रेसमध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप केला होता. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, १३ जुलै रोजी जीआरपीला रूग्णालयातून फोन आला. पोलिसांना माहिती मिळाली की, एक महिला रूग्णालयात दाखल झाली आहे. तिच्या गुप्तांगावर जखमांच्या खुणा आहेत.

याची माहिती मिळताच पोलिसांनी रूग्णालयात धाव घेतली. तसेच पोलिसांनी महिलेची चौकशी केली. चौकशीत महिलेनं चालत्या एक्स्प्रेसमध्ये लैंगिक अत्याचार झाल्याचे सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी महिला गोरखपूर एक्सप्रेसच्या जनरल कोचमधून प्रयागराजहून मुंबईच्या दिशेनं जात होती. तिनं सांगितलं की, ट्रेनच्या वॉशरूममध्ये गेली होती.

त्याचवेळी तिथे अज्ञात व्यक्ती पोहोचला. पुरूषानं वॉशरूमचा गेट बंद केला. नंतर जबरदस्तीनं लैंगिक अत्याचार केला. पोलिसांनी महिलेचा जबाब नोंदवून घेतला. त्यावेळी महिला तक्रार नोंदवून देण्यास नकार देत होती. मात्र, पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपासाला सुरूवात केली.

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. तपासात महिला आपल्या प्रियकरासोबत मुंबईला जात होती. दोघांनी १२ जुलैची रात्र एका गेस्ट हाऊसमध्ये घालवली. तिथे त्यांनी शारीरिक संबंध ठेवले. यामुळे तिच्या गुप्तांगांना दुखापत झाली. तसेच तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले, अशी माहिती पोलीस तपासातून समोर आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT