Gold Silver Price Today
Gold Silver Price Today Saam tv
देश विदेश

Gold & Silver Rates Today : सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा धक्का; आजही दरात पुन्हा वाढ; पाहा आजचे दर

Vishal Gangurde

Gold & Silver Rates Today : लग्नाचा हंगाम सुरू होण्यााआधीच सोन्याचा दरात वाढ झाली आहे. सराफा बाजारात सोन्याचा आजचा दर ५६,४९४ रुपयांपर्यत पोहोचला आहे. आंतराष्ट्रीय बाजारातही आज सोने आणि चांदीच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे . (Latest Marathi News)

आज एमसीएक्स (MCX Gold Rate) वर सोन्याच्या (Gold) दराच्या तेजीसहित ट्रेडिंग सुरू झाली. सोमवारी १६ जानेवारी रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा दर ०.३१ टक्के आहे. तर चांदीचा दर ०.७१ टक्के आहे.

सोमवारी सराफा बाजारात २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा दर ९:२० वाजता १७३ रुपयांनी वाढ होऊन ५६,४९४ रुपये प्रति १० ग्रॅम होता. आज सोन्याची ट्रेडिंग ५६,४६७ रुपयांपासून सुरू झाली होती. आज सुरुवातीला सोन्याचा दर ५६,५०० रुपये होता. त्यानंतर ५६,४९४ रुपये इतका सोन्याचा दर झाला. (Gold & Silver Prices)

चांदीच्या दरात तेजी

सराफा बाजारात आज चांदीचा (Silver) दर ४९६ रुपये वाढून ६९, ९२३ रुपये झाला आहे. तर चांदीचा दर आज ६९,५०० रुपयांपासून सुरू झाला होता.

आंतरराष्ट्रीय बाजार तेजी

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात आज ०.२७ टक्क्यांनी तेजी पाहायला मिळत आहे. १,९२, ६५ डॉलर प्रति झाला आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरात आज ०.७९ टक्के वाढून २४.४६ डॉलर प्रति झाला आहे. गेल्या ३० दिवसांत सोन्याच्या दरात ७.४५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. चांदीच्या दरात ५.५७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai School News: मुंबईच्या प्रसिद्ध शाळेतील मुख्यध्यापिका पदावरून बडतर्फ; पॅलेस्टाइनवरील पोस्ट लाइक केल्याने कारवाई

Water Shortage : सीना कोळेगाव प्रकल्पात केवळ ८ टक्के पाणीसाठा; परंडा तालुक्यात सिंचनाचा प्रश्न गंभीर

Today's Marathi News Live : अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीन अर्जावर शुक्रवारी निकाल

Pune Crime News : किरकोळ कारणावरून पुण्यात तुफान हाणामारी; 20 जणांच्या टोळक्याचा दोघा तरुणांवर हल्ला, पहा Video

Reels साठी पोरांनी महागड्या कार चोरल्या, सोशल मीडियावर घालायचा होता धुमाकूळ, आता बेड्या पडल्या

SCROLL FOR NEXT