मुख्यमंत्री विजय यांना मोठा धक्का; TVKच्या बड्या नेत्याला ड्रग्ज प्रकरणात अटक

TVK Leader Arrested : तमिळनाडूमध्ये मुख्यमंत्री विजय यांच्या टीव्हीके पक्षाच्या जिल्हा पदाधिकाऱ्याला अमली पदार्थ तस्करी प्रकरणात अटक करण्यात आलीय. नागापट्टिनममध्ये १३५ किलो मेथॅम्फेटामाइन जप्त करण्यात आले आहे.
Tamil Nadu CM Vijay Thalpathi Party TVK District Leader Arrested in Drug Trafficking Case
Tamil Nadu CM Vijay Thalpathi Party TVK District Leader Arrested in Drug Trafficking Casesaam tv
Published On: 

तमिळनाडूतील नागापट्टिनम येथे अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणीत टीव्हीके (TVK) पक्षाचा जिल्हास्तरीय पदाधिकारी भूपालन आणि त्याचा साथीदार सुगन यांना अटक करण्यात आलीय. महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) सुगनच्या राहत्या घरातून १३५ किलो मेथॅम्फेटामाइन जप्त केलंय. या घटनेवरून भाजप, एआयएडीएमके (AIADMK) आणि डीएमके (DMK) या पक्षांनी टीव्हीकेवर निशाणा साधलाय.

Tamil Nadu CM Vijay Thalpathi Party TVK District Leader Arrested in Drug Trafficking Case
Tiger Shroff Firing: गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा थेट पोलीस आयुक्तांना फोन; तासाभरात १५ पथकं तयार, एक संशयित ताब्यात

'तमिळगा वेत्री कळगम' (TVK) या पक्षाच्या एका जिल्हा पदाधिकाऱ्याला तामिळनाडूमध्ये अमली पदार्थ तस्करीच्या प्रकरणात अटक करण्यात आलीय. 'डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स' (DRI) ने नागपट्टिनम येथे केलेल्या कारवाईदरम्यान ४२ वर्षीय भूपालन याला ताब्यात घेतले. व्यवसायाने वकील असलेला भूपालन, पक्षाच्या जिल्हा कार्यकारी समितीचा सदस्य आहे. या प्रकरणाशी संबंधित सुगन नावाच्या त्याच्या एका सहकाऱ्यालाही अटक करण्यात आलीय.

Tamil Nadu CM Vijay Thalpathi Party TVK District Leader Arrested in Drug Trafficking Case
भारत, इटली, फ्रान्स अमेरिका...,8 देशांमध्ये का होतायेत आंदोलनं? नेमकं काय आहे कारण?

डीआरआय (DRI) च्या पाच सदस्यांच्या पथकाने कीलहापिडागाई गावातील चिंतामणी येथे असलेल्या भूपालनच्या निवासस्थानी झडती घेतली. यावेळी मेथॅम्फेटामाइनच्या तस्करीबाबत त्याची चौकशी करण्यात आली. अधिकाऱ्यांनी प्रतापरामपुरममधील त्याच्या ओळखीच्या व्यक्तींच्या घरांवरही छापे टाकले.

या कारवाईदरम्यान, सुगनच्या घरातून १३५ किलो मेथॅम्फेटामाइन जप्त करण्यात आले. दरम्यान चौकशीसाठी २७ वर्षीय जे. सुगन, त्याचा २९ वर्षीय भाऊ जे. पार्थिबन आणि ३० वर्षीय डी. सतीश यांना अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलंय. .

या कारवाईनंतर टीव्हीकेने भूपालन यांची पक्षातून हकालपट्टी केली. पक्षाने एका निवेदनात स्पष्ट केले की, त्यांच्या वर्तनामुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाली. यामुळे ही कारवाई करण्यात आलीय. त्यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांवरून काढून टाकण्यात आल्याचं टीव्हीके पक्षाच्या नेत्यांनी सांगितले.

भाजप आणि अण्णाद्रमुक पक्षाची विजय यांच्यावर टीका

भाजपच्या तमिळनाडू युनिटने या मुद्द्यावरून मुख्यमंत्री विजय यांच्यावर टीका केली आहे. पक्षाने म्हटलं की, अमली पदार्थ नष्ट करण्याबाबत जनतेला संदेश देण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी आपल्याच पक्षातील सदस्यांना अमली पदार्थांच्या तस्करीमध्ये सहभागी होण्यापासून रोखण्यासाठी पावले उचलली पाहिजेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com