पुण्यात खड्ड्यात पडून एका व्यक्तीचा मृत्यू, मनपाचा निष्काळजीपणा बेतला जीवावर? 8 महिन्यात खड्ड्यांमुळे 198 जणांचा बळी

Pune Road Safety Crisis: पुण्यात महापालिकेच्या ड्रेनेजच्या खड्ड्यात पडून एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. पुण्यात खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्याची ही पहिली घटना नाहीये. याआधीही अनेकांचे जीव गेलेत... मात्र महापालिका प्रशासन अद्याप ढिम्मं असल्याचं दिसतंय. पाहूयात यावरचा हा रिपोर्ट...
PUNE DRAINAGE PIT DEATH: PMC NEGLIGENCE UNDER SCRUTINY
PUNE DRAINAGE PIT DEATH: PMC NEGLIGENCE UNDER SCRUTINYsaam tv
Published On: 

ही दृश्ये नीट पाहा... पुण्यातील येरवडा मच्छी मार्केट परिसरातील ही घटना... महापालिकेच्या ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या 10 ते 15 फूट खोल खड्ड्यात पडून 55 वर्षीय प्रदीप परदेशी यांचा मृत्यू झालाय. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. महत्त्वाचं म्हणजे, ड्रेनेजची नवीन वाहिनी टाकण्यासाठी पालिकेकडून खोदकाम सुरू होतं. याच कामासाठी परिसरात मोठा खड्डा खोदण्यात आला होता.मात्र, 17 ऑक्टोबरला परिसरातून जात असताना प्रदीप परदेशी यांना रिक्षाचा धक्का लागला. त्यानंतर ते ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडल्याची माहिती समोर आलीये. या घटनेनंतर पुण्यात राजकारण तापलंय. महानगरपालिकेने याची गंभीर दखल घेतली नाही तर आंदोलनाचा इशारा शिंदेसेनेनं दिलाय.. तर दुसरीकडे, दोषींवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन सत्ताधाऱ्यांनी दिलंय...

पुण्यात जीवघेण्या खड्डयांचा बळी -

दरम्यान, पुण्यात खड्ड्यात पडून मृत्यू झालेल्या घटनांवर एक नजर टाकूयात...

पुण्यातील रस्ते नागरिकांच्या जीवावर

1 ऑगस्ट 2025

औंध

खड्ड्यामुळे दुचाकी घसरून कारखाली आल्यानं जगन्नाथ काशिनाथ काळे यांचा मृत्यू

ऑगस्ट 2026

म्हाळुंगे-नांदे रस्ता

रस्त्यावरील खड्डे आणि साचलेल्या मातीमुळे दुचाकी घसरून 11 वर्षीय विराज पाटोळेचा मृत्यू

17 ऑक्टोबर 2026

येरवडा

ड्रेनेजसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून प्रदीप परदेशी यांचा मृत्यू

रस्ते अपघातांतील मृत्यू

वर्ष रस्ते अपघातांतील मृत्यू

2022 325

2023 370

2024 341

2025 290

2026 198

खड्ड्याभोवती बॅरिकेडिंग, धोक्याचे इशारे देणारे फलक, रात्रीच्या वेळी पुरेशी प्रकाशव्यवस्था आणि वाहतुकीचे योग्य नियोजन आवश्यक असते. मात्र, या ठिकाणी अशा उपाययोजना पुरेशा प्रमाणात करण्यात आल्या होत्या का?... जर कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजनांचा अभाव असेल, तर त्याची जबाबदारी कोणाची?... असे अनेक प्रश्न यानिमित्तानं उपस्थित झालेत. रस्ते दुरुस्तीसाठी प्रशासनाने कोट्यवधींचा निधी मंजूर झाला. पण नेमकी गुणवत्तेची कामे झाली का? हाच खरा प्रश्न आहे. आता या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर पालिका प्रशासन काय कारवाई करणार?.याकडेही सगळ्यांच लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com