एक फुटाच्या अंतरावरून टायगर श्रॉफच्या कारवर १० राऊंड फायर; हल्ल्याचा थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ Viral

Firing On Tiger Shroff Car Video : मुंबईतील जुहू परिसरात टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. अभिनेता सुरक्षित असून दोघे जखमी झाल्याचे वृत्त आहे.
Tiger Shroff firing case latest news and viral video
Tiger Shroff firing case latest news and viral videosaam tv
Published On: 
Summary
  • मुंबईतील जुहू परिसरात टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार

  • सोशल मीडियावर गोळीबाराचा व्हिडिओ व्हायरल

  • उपलब्ध वृत्तांनुसार, टायगर श्रॉफ सुरक्षित असून त्याचा चालक आणि एक रिक्षाचालक जखमी

अभिनेता टायगर श्रॉफला लक्ष्य करून गोळीबाराची एक घटनेने मुंबई हादरलीय. दुचाकीवरून आलेल्या ३ अज्ञात हल्लेखोर सामील होते. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत अभिनेत्याचा चालक आणि एक रिक्षाचालक जखमी झाले आहेत. लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित अनिल पंडित याने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलीय. या घटनेचे काही व्हिडिओ समोर आलेत, ज्यामध्ये गोळीबाराचा थरार कैद झालाय. या व्हिडिओमध्ये अभिनेता टायगर श्रॉफच्या वाहनावरअदांधुद गोळ्या झाडल्या. या गोळीबारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.

टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओ

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना घडली तेव्हा टायगर श्रॉफ 'पुष्पा पार्क' परिसरात होता. व्हिडिओमध्ये दिसतंय की, काही चाहते अभिनेत्याची झलक पाहण्याच्या आशेने त्याचा व्हिडिओ काढत होते, तेव्हा अचानक गोळीबाराचा आवाज झाल्यामुळे गोंधळ उडाला. ही संपूर्ण घटना तिथे उपस्थित असलेल्या आणि चाहत्यांच्या मोबाईल फोनच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

फुटेजमध्ये आपण पाहू शकतो, दोन हल्लेखोर एका वाहनाच्या एक फुटाच्या अंतरावरून राऊंड फायर करताना दिसत आहेत. हल्ला केल्यानंतर हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. त्यानंतर चाहते टायगरला आवाज देताना दिसत आहेत. टायगर श्रॉफ कारच्या दुसऱ्या बाजूने बाहेर पडताना दिसतोय.

Tiger Shroff firing case latest news and viral video
Tiger Shroff Firing Video: दोन सेकंदात ५ राउंड; अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर

एका अहवालानुसार, अज्ञात हल्लेखोरांनी टायगरच्या वाहनावर सुमारे ५ राऊंड गोळीबार केला होता . या गोळीबारात अभिनेत्याचा चालक आणि जवळच असलेला एक रिक्षाचालक जखमी झाल्याचे वृत्त आहे. घटनेनंतर, जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. पोलिसांच्या माहितीनुसार, टायगर श्रॉफ सुरक्षित आहे. सध्या या घटनेचा तपास सुरू आहे. पोलीस तपासनंतर टायगरच्या कारवर १० गोळ्या झाडण्यात आल्याच सांगितलं जातंय.

Tiger Shroff firing case latest news and viral video
मोठी बातमी! अभिनेता टायगर श्रॉफवर अज्ञातांकडून गोळीबार

लॉरेन्स बिश्नोई टोळीने जबाबदारी स्वीकारली

टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीतील अनिल पंडित याने स्वीकारलीय. एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे, यामध्ये एक व्यक्ती स्वतःला लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य असल्याचे सांगतोय. या व्यक्तीने म्हटले आहे की, टायगरवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी तो आणि त्याचा भाऊ हरमन संधू घेत आहेत.

त्यानंतर एका ऑडिओमध्येही त्यांनी टायगरला याआधीच एक धमकी दिली होती. ऑडिओमध्ये सलमान खानचाही उल्लेख असून, त्याच्यासोबत काम करण्याच्या संदर्भात जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. इतकेच नव्हे तर, सलमान आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला संपवून टाकण्याची धमकीही देण्यात आली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com