Smartphone Offer : सॅमसंग युझर्स साठी एक आनंदाची बातमी आहे.सॅमसंग पुढच्या महिन्यात त्यांची फ्लॅगशिप सिरीज लॉन्च करणार आहे.लॉन्च करण्यापूर्वीच कंपनीने या फोनची प्री-बुकिंगची सुविधा दिली आहे.
जे लोक सॅमसंगचे फोन वापरतात त्यांना नेहमी त्याच कंपनीचे वेगवेगळया सिरिजचे फोन वापरायला आवडतात त्यामुळे या प्री-बुकिंगचा त्यांना नक्कीच फायदा होईल.
पुढच्या महिन्यात १ फेब्रुवारीला (२०२३) Samsung Galaxy S23 हा फोन भारतामध्ये लॉन्च करणार आहेत. तुम्ही जर हा फोन खरेदी करण्यासाठी उत्साही असला तर तुम्ही सॅमसंगच्या ऑफिशियल वेबसाईट वर जाऊन प्री-बुकिंग करू शकता.
1. Samsung Galaxy S23 प्री-बुकिंग बद्दल माहिती (Information)
हँडसेट निर्माता सॅमसंग पुढील महिन्यात भारतीय (India) बाजारपेठेत आपली फ्लॅगशिप Samsung Galaxy S23 सीरीज लॉन्च करणार आहे. कंपनीने पुढील महिन्यात 1 फेब्रुवारी 2023 रोजी लाँच होणाऱ्या या मालिकेसाठी प्री-बुकिंग सुरू केली आहे, याचा अर्थ असा की जर तुम्हाला ही आगामी फ्लॅगशिप मालिका खरेदी (Shopping) करण्यातही रस असेल तर तुम्ही Samsung Galaxy S23 मालिकेसाठी प्री-बुकिंग करू शकता.
Galaxy S23 व्यतिरिक्त, Galaxy S23 Plus आणि Galaxy S23 Ultra सॅमसंगच्या या फ्लॅगशिप सीरीज अंतर्गत लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. तुमच्या माहितीसाठी सॅमसंग ब्रँडची ही आगामी सीरीज कंपनीच्या अधिकृत साइटवरून प्री-बुकिंग केली जाऊ शकते.
2. Samsung Galaxy S23 सीरीज प्री बुकिंग तपशील
पुढील महिन्यात लॉन्च होणार्या Samsung Galaxy S23 सीरीजचे प्री-बुकिंग करणार्यांना कंपनीकडून प्री-बुकिंग ऑफर देखील मिळतील. सॅमसंगच्या अधिकृत साइट Samsung.com वर दिलेल्या माहितीवरून समोर आले आहे की सॅमसंगच्या या फ्लॅगशिप सीरीजचे प्री-बुक करणार्यांना कंपनीकडून 5,000 रुपयांचा फायदा होईल.
3. किती रुपये देऊन करता येईल प्री-बुकिंग
जर तुम्हाला या फोन (Phone) प्री-बुकिंग करायची इच्छा असेल तर Samsung च्या ऑफिशियल वेबसाइट (Website) जाऊन करू शकता.पण त्यासाठी किती पैसे (Money) भरावे लागतील? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तुम्हाला त्यांच्या वेबसाइट जाऊन 1,999 रुपये एवढे पैसे भरायचे आहे. प्री-बुकिंग करणाऱ्या युझर्सला फोन ची डिलिव्हरी लवकर मिळेल त्याबरोबरच 5000 रुपयाचे ऑफर मिळणार आहे.
4. Samsung Galaxy S23 सिरीज Specifications
फ्लॅगशिप सिरीज साठी सॅमसंगने त्यांच्या वेबसाइट वर वेगळा पेज तयार केला आहे त्यात फक्त प्री-बुकिंग करता येईल किंवा त्याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल.या सिरीज चे मुख्य आकर्षण म्हणजे झूम क्वालिटी अप्रतिम आहे सोबतच शानदार नाईट फोटोग्राफरीचा आनंद तुम्हाला घेता येईल. Galaxy S23 ultra मध्ये चार रिअल कॅमेरा मिळू शकतो आणि त्यात प्रायमरी लेन्स 200 मेगापिक्सलची असेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.