Gas Geyser Saam TV Marathi News
देश विदेश

Gas Geyser : बाथरूममध्ये जोडप्याचा मृत्यू,पत्नी निर्वस्त्र आढळली, तर नवरा....; मृतदेह काढण्यासाठी तोडला दरवाजा

Gas geyser bathroom suffocation couple death : उत्तर प्रदेशातील पिलीभीत येथे बंद बाथरूममध्ये गॅस गिझर सुरू असल्याने दाम्पत्याचा गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Namdeo Kumbhar

Gas geyser accident in Uttar Pradesh winter : राजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेशमध्ये सध्या कडाक्याची थंडी पडली आहे. हिवाळा वाढला की प्रत्येक घरात गिझरचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतोय. पण हाच गॅस गिझर मृत्यूचे कारण ठरत असल्याचे समोर आलेय. उत्तर प्रदेशमधील बरेलीतील पिलीभीत येथे गॅस गिझरमुळे दाम्पत्याचा मृत्यू झालाय.

गॅज गिझरचा वापर करताना निष्काळजीपणा जीवघेणा ठरल्याची दुःखद घटना पिलीभीत शहरातील गुरुकुलपुरम परिसरात घडली. बाथरूममध्ये गॅस गिझर चालू असल्यामुळे दाम्पत्यांचा गुदमरून मृत्यू झाला. जिल्हा ग्रामीण विकास संस्थेचे (डीआरडीए) कर्मचारी हरजिंदर सिंग आणि त्यांची पत्नी रेणू यांचा मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलिसांनी बाथरूमचा दरवाजा तोडून दोघांचेही मृतदेह बाहेर काढले.

पोलिसांनी दरवाजा तोडला, अन्...

हरजिंदर सिंग हे डीआरडीएमध्ये चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी होते. ते पत्नीसह रेंटच्या घरात एकटेच राहत होते. रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घरमालकाने हरजिंदरला फोन केला. पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे घरमालकान रेणूलाही फोन केला. पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. घरमालकाला संशयास्पद वाटल्याने शेजारच्यांना सांगितले अन् खोलीत डोकावले पण कोणीही आढळले नाही. त्यांनी अनेकदा हाक मारली पण प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली अन् दरवाजा तोडला. बाथरूममध्ये त्यांना मृतदेह आढळले. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले.

मृत्यूचे नेमकं कारण काय?

बाथरूमला खिडकी नव्हती, त्यात गॅस गिझर चालू होता. बाथरूममध्ये ऑक्सिजन कमी झाल्याने गुदमरून या जोडप्याचा मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. दाम्पत्यांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. रिपोर्टनंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येईल.

भीषण अपघातानंतर पत्नी होती आजारी

मृत हरजिंदर सिंग यांनी ६ वर्षांपूर्वी रेणू सक्सेनाशी प्रेमविवाह केला होता. काही दिवसांपूर्वी दुचाकी अपघातात रेणूचा हात फ्रॅक्चर झाला होता. रविवारी ते दोघेही बराच वेळ बाथरूममध्ये होते. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे दोघांचा गुदमरून मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रेणू बाथरूममध्ये नग्न अवस्थेत आढळली. तर हरजिंदर सिंग पूर्णपणे कपडे घातलेले होते.

गॅस गिझर धोकादायक, काळजी घ्याच...

हिवाळा वाढला की गॅस गिझरचा वापरही मोठ्या प्रमाणात होते. पण गिझर वापरताना काळजी घेणं गरजेचे आहे. बंद बाथरूममध्ये गॅस गिझर वापरल्याने ऑक्सिजनची पातळी कमी होते आणि कार्बन मोनोऑक्साइड तयार होते. त्यामुळे गुदमरण्याचा धोका वाढतो. त्यामुळे गॅस गिझर वापरत असाल तर बाथरूममध्ये हवा खेळती असायला हवी. जास्त वेळ गीझर चालू ठेवू नका. दरवाजे आणि खिडक्या किंचित उघड्या ठेवा. मुले आणि वृद्धांना एकटे सोडू नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Milk Food Combinations: दुधासोबत कोणते पदार्थ खाल्याने Acidity समस्या वाढते?

Cancer: महिलांच्या शरीरात हे बदल दिसले तर समजा कॅन्सर झालाय

Maharashtra Live News Update : वर्ध्यात सामान्य रुग्णालयात आग!

Maharashtra Politics: पुण्यात भाजपनं पुन्हा खिंडार पाडलं, मविआचे अनेक दिग्गज नेते हाती घेणार 'कमळ'

महायुतीत जिथं ज्याचं बळ, तिथं स्वबळ? निकालानंतर बदललं बार्गेनिंग पॉवरचं गणित?

SCROLL FOR NEXT