Shaktipeeth Expressway connected to Jan Kalyan Expressway : नागपूर ते गोवा या शक्तिपीठ 'एक्सप्रेस वे'मध्ये काही दिवसांपूर्वीच मोठा बदल करण्यात आला. सोलापूरमध्ये या महामार्गात बदल करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. नागपूर-गोवा या महामार्गावरूनच आता मुंबईलाही वेगात पोहचता येणार आहे. एमएसआरडीसीने (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ) नागपूर-गोवा प्रवास वेगात करण्यासाटी शक्तिपीठ महामार्ग बांधण्याचा आराखडा तयार करण्यात आलाय. याच महामार्गाला लातूरमधून निघणारा जनकल्याण एक्सप्रेसवे जोडण्यात येणार आहे. त्यामुळे आता समृद्धी महामार्गासोबत मुंबईला जाण्यासाठी नागपूरकरांसाठी आणखी एक पर्याय तयार होणार आहे.
शक्तिपीठ महामार्ग लातूर येथे जनकल्याण महामार्गाला (लातूर-कल्याण) जोडण्यात येणार आहे. लातूर जिल्ह्यातील मुरूडमधील बार्शी रोडवर जनकल्याण आणि शक्तिपीठ महामार्ग अंटरचेंज मार्गिकेद्वारे जोडले जाणार आहेत. त्यामुळे भविष्यात नागपूरहून मुंबईला जाण्यासाठी समृद्धी महामार्गाशिवाय आणखी एक पर्याया असेल. त्याशिवाय लातूरकरांना गोव्याला जाण्यासाठीही नवा पर्याया मिळेल. नागपूरहून शक्तिपीठ महामार्गाने गोव्याला जाता येणार आहे, त्याचवेळी जनकल्याण एक्सप्रेस वे मुंबईमध्येही पोहचता येणार आहे. या इंटरजेंचचा फायदा सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांनाही मोठ्या प्रमाणात होईल.
काही दिवसांपूर्वी लातूर-मुंबई या दोन शहरांना जोडण्यासाठी जनकल्याण एक्सप्रेसवेची घोषणा करण्यात आली. एमएसआरडीसीकडून हा महामार्ग बांधण्यात येणार आहे. हा महामार्ग पुढे हैदराबादपर्यंत वाढवण्यात येणार आहे. कल्याण-लातूर-हैदराबाद हा प्रवास आता सुसाट होणार आहे. लातूर ते कल्याण हा ४४२ किमीचा महामार्ग एमएसआरडीसी बांधणार आहे. पहिल्या टप्प्यात लातूरपर्यंत महामार्गाचे काम होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात लातूर-हैदराबाद पर्यंतचा महामार्ग तयार होणार आहे. जनकल्याण महामार्ग सेवेत आल्यानंतर लातूर-कल्याण हा प्रवास फक्त ४ तासांत पूर्ण होणार आहे. जनकल्याण महामार्ग हा बदलापूरहून सुरू होणार आहे, लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी इथपर्यंत असेल. बदलापूरमध्ये जनकल्याण महामार्ग समृद्धीला जोडणार असल्याच्याही माहिती समोर येत आहे.
जनकल्याण महामार्ग पुढे हैदराबादपर्यंत नेण्यात येणार आहे. औराद शहाजनीपासून हैदराबादपर्यंत हा एक्सप्रेस वे तयार होणार आहे. मुंबई ते हैद्राबाद हा महामार्ग ५९० किमीचा असेल. शहाजनी ते कर्नाटक ही लांबी ६१ किमी इतकी असेल. तर तेलंगणातील लांबी ७९ किमी इथकी असेल. हा महामार्ग कर्नाटक आणि तेलंगणा सरकारकडून बांधण्यात येणार आहे. हा महामार्ग तयार झाल्यास मुंबई आणि हैदराबाद प्रवास अतिशय वेगात होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.