Crime Saam tv news
देश विदेश

Crime: नोकरीचे आश्वासन देऊन घात केला; धावत्या कारमध्ये तरुणीवर सामूहिक अत्याचार, शहर हादरलं

Gang physical assaulted in Moving Car: एका अल्पवयीन मुलीला नौकरीची भूलथाप देत सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी आरोपींना अटक केली

Bhagyashree Kamble

उत्तरप्रदेशातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीला नौकरीची भूलथाप देत तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी आरोपींना अटक केली असून, पळ काढणाऱ्या आरोपीला पकडताना पोलिसांनी गोळीबार केला. यात आरोपींच्या पायाला जखम झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, नराधमांची कसून चौकशी सुरू आहे.

पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार, पीडित महिला मूळची प्रतापडची रहिवासी आहे. ती नोएडातील जलेबी चौक परिसरात आपल्या मामासोबत भाड्याच्या घरात राहत होती. तसेच त्याच परिसरात ती खासगी कंपनीत कामाला होती. काही तरूणांनी पीडित मुलीला चांगल्या ठिकाणी नोकरी लावून देण्याची भूलथाप दिली. ६ मे रोजी पीडित मुलगी आपल्या मैत्रिणीसोबत सूरजपुर कोर्ट परिसरात गेली होती. तिला तरूणांनी फार्महाऊसमध्ये नेलं तसेच तिला दारू पाजली.

तसेच तिला एका वाहनात बसवून परिसरात फिरवलं. तिच्यासोबत तिची मैत्रीण देखील उपस्थित होती. कारमधील तरूणांनी पीडित मुलीच्या मैत्रिणीला देखील दारू पाजली. तसेच तिला रस्त्याच्या कडेला धक्का मारून उतरवले आणि आरोपींनी पीडित मुलीसोबत चालत्या कारमध्येच लैंगिक अत्याचार केला.

यानंतर पीडित मुलीने तातडीने पोलीस ठाणे गाठत पोलिसांना आपबिती सांगितली. या प्रकरणानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपींना ताब्यात घेतलं. त्यातील २ आरोपी हे पळ काढत होते. मात्र, पोलिसांनी त्यांच्या पायाला गोळी मारली आणि त्यांना पकडले. या प्रकरणाची पोलीस अधिक चौकशी करत असून, पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Accident News : समृद्धी महामार्गावर एका रात्रीत चार अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! ५ वर्षात मिळणार ५ लाखांचं व्याज; वाचा सविस्तर

Lifestyle: हार्ट अटॅक आणि स्ट्रोक येण्यामागे आपल्या 'या' घाणेरड्या सवयी कारणीभूत; धोका कोणाला जास्त?

Accident News : घंटागाडीची दुचाकीला धडक, गाडीचा जागीच चक्काचूर

SCROLL FOR NEXT