Crime News: घरगुती भांडणातून वाद! नवऱ्यानं गर्भवती महिलेच्या पोटात अन् पाठीत चाकूने केले सपासप वार

Pregnant Woman Attacked with Knife by Husband: फ्रेजरपुरा पोलिस स्टेशनच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. घरगुती वादातून एका पतीने आपल्या गर्भवती पत्नीवर चाकूने वार करून प्राणघातक हल्ला केला.
Crime News
Crime NewsX
Published On

घरगुती वादातून पतीने आपल्या गर्भवती पत्नीच्या पोटात आणि पाठीवर चाकूने हल्ला केला आहे. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने तपास करून आरोपीला अटक केली आहे. ही धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यातील बोडना फाटा, फ्रेजरपुरा पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली असून, या प्रकरणानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पूजा राहुल ताबोरे (वय वर्ष ३०) असे जखमी गर्भवती महिलेचे नाव आहे. आरोपी पती आणि महिलेमध्ये घरगुती कारणावरून नेहमी वाद होत असे. काही दिवसांपूर्वी पती आणि पत्नीचे घरगुती वादातून कडाक्याचे भांडण झाले होते. भांडणाचे रूपांतर मारहाणीत झाले. पतीने रागाच्या भरात चाकू घेतला आणि पत्नीवर वार करण्याचा प्रयत्न केला.

Crime News
Mother's Day: केंद्र सरकारची 'आई'साठी खास योजना; खात्यात खटाखट ५००० रूपये जमा होणार, आजच ONLINE अर्ज करा

आरोपी पतीने पत्नीच्या पोटावर पाठीवर चाकूने सपासप वार केले. घटनेनंतर अमरावती शहर पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत महिलेला जिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवलं. सध्या तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.

Crime News
IND v/s PAK: भारतात राहून पाकिस्तानचा पुळका, सोशल मीडियावर गरळ ओकली; ५० जणांना बेड्या ठोकल्या

या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास करीत आरोपी पतीला बेड्या ठोकल्या असून, पुढील चौकशी सुरू आहे. पोलिसांकडून या प्रकाराकडे गंभीरतेने पाहिले जात आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांकडून पतीविरोधात रोष व्यक्त केला जात असून, संतापही व्यक्त केला जात आहे.

Crime News
Sofia Qureshi: पाकड्यांना भिडणाऱ्या कर्नल सोफिया सलमान खानच्या फॅन? मुलाखतीत कोणत्या चित्रपटाचा उल्लेख केला?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com