Mother's Day: केंद्र सरकारची 'आई'साठी खास योजना; खात्यात खटाखट ५००० रूपये जमा होणार, आजच ONLINE अर्ज करा

Financial Support for Pregnant Women: गर्भवती महिलांसाठीही केंद्र सरकारने खास योजना सुरू केली आहे. पंतप्रधान मातृवंदना योजना असे योजनेचे नाव असून, या योजनेमुळे महिलांना सरकारकडून आधार मिळतो.
Mother's Day 2025
Mother's Day 2025Saam TV
Published On

महिलांसाठी केंद्र तसेच राज्य सरकार विविध योजना राबवतात. गर्भवती महिलांसाठीही केंद्र सरकारने खास योजना सुरू केली आहे. पंतप्रधान मातृवंदना योजना असे योजनेचे नाव असून, या योजनेमुळे महिलांना सरकारकडून आर्थिक आधार मिळतो.

पंतप्रधान मातृवंदना योजना २०१७ साली सुरू करण्यात आली होती. ८ वर्षात ३.९ कोटी गर्भवती महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे. या योजनेचा लाभ कोणतीही गर्भवती महिला घेऊ शकते. ही योजना नक्की काय आहे? खात्यात नेमके किती पैसे जमा होतात? जाणून घेऊयात.

पंतप्रधान मातृवंदना योजना खास गर्भवती महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे. ही योजना खास महिलांसाठी राबवण्यात येत आहे. १ जानेवारी २०१७ साली केंद्रीय महिला आणि बाळ कल्याण मंत्रालयाने ही योजना सुरू केली होती. गर्भवती महिला आणि स्तपान करणाऱ्या मातांना योग्य पोषण आणि आरोग्य सेवा मिळावी यासाठी आर्थिक मदत देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

Mother's Day 2025
Pune News: 'पाकिस्तान जिंदाबाद' इंजिनिअर तरूणीवर कॉलेजकडून कारवाई; तपासात धक्कादायक माहिती समोर

पंतप्रधान मातृवंदना योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना पहिल्यांदा ५००० रूपये दिले जातात. हे पैसे दोन हप्त्यांमध्ये मिळतात. जर एखादी महिला दुसऱ्यांदा गर्भवती राहिली आणि तिला मुलगी झाली तर, तिच्या खात्यात ६००० रूपये जमा होतात. जर गर्भवती महिलेला मुलगी झाली तरच हे पैसे महिलेच्या बँक खात्यात जमा होतात.

Mother's Day 2025
Viral: बायकोनं नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, हॉटेलमध्ये प्रेयसीसोबत 'या' अवस्थेत होता, VIDEO तुफान व्हायरल

पंतप्रधान मातृवंदना योजनेसाठी पात्रता

गर्भवती महिलेचं वय कमीत कमी १९ वर्षे किंवा त्याहून अधिक असणं गरजेचं.

जर, एखाद्या गर्भवती महिलेने दुसऱ्यांदा जुळ्या मुलांना जन्म दिला आणि त्यापैकी एक मुलगी असेल तर, तिला पंतप्रधान मातृवंदना योजनेअंतर्गत लाभ मिळेल.

गर्भवती महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी असावे.

महिलेकडे ई श्रम कार्ड किंवा बीपीएल कार्ड असणे अनिवार्य आहे.

सरकारी योजनेचा लाभ मिळत नसणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळेल. ऑनलाइन अर्जाद्वारे आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता.

Mother's Day 2025
India-Pakistan: भारत पाकिस्तानातील तणाव वाढला; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com