Sofia Qureshi: पाकड्यांना भिडणाऱ्या कर्नल सोफिया सलमान खानच्या फॅन? मुलाखतीत कोणत्या चित्रपटाचा उल्लेख केला?

Indian Army Officer Colonel Sophia Qureshis Old Video Goes Viral: सध्या कर्नल सोफिया कुरेशी यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्या सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाचा उल्लेख करताना दिसत आहेत.
Sofia Qureshi
Sofia QureshiSaam
Published On

‘ऑपरेशन सिंदूर फत्ते’मध्ये मोलाची भूमिका बजावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांचं नाव सध्या देशभरात चर्चेत आहे. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक बाबीही समोर येत आहेत. सध्या त्यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्या सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाचा उल्लेख करताना दिसत आहेत.

सध्या कर्नल सोफिया कुरेशी यांचे अनेक मुलाखतीचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. त्यांचा एक जुना व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्या सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान' या चित्रपटाचा उल्लेख करताना दिसत आहेत. त्यामुळे सलमानचे चाहते आणि चित्रपटप्रेमी देखील यामध्ये विशेष रस घेत आहेत.

Sofia Qureshi
Mother's Day: केंद्र सरकारची 'आई'साठी खास योजना; खात्यात खटाखट ५००० रूपये जमा होणार, आजच ONLINE अर्ज करा

सोफिया कुरेशी यांना सलमान खानचा चित्रपट का आठवला?

हा व्हिडिओ २०१७ सालचा आहे. त्यावेळी कर्नल सोफिया एक कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. तेव्हा त्या मेजर पदावर कार्यरत होत्या. त्या दररोज ड्युटी संपवून जवळच्या एका अनाथाश्रमात जात असत. तिथे एक लहान मुलगी रोज त्यांना भेटायला यायची आणि प्रेमाने मिठी मारायची. त्या मुलीविषयी कुरेशी म्हणतात, 'त्या मुलीने मला कायमच मुन्नीची कायम आठवण करून दिली आहे'

Sofia Qureshi
Satara Accident: साताऱ्यात भाविकांच्या मिनी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात, मध्यरात्री ट्रकला धडकली; तिघांचा मृत्यू, ८ जण जखमी

बजरंगी भाईजान या चित्रपटात सलमान खान मुन्नीला आपल्या मायदेशी सोडतो. सोफिया कुरेशी यांनी या चित्रपटातील प्रसंगाशी स्वतःचा अनुभव जोडला आहे. सलमान खानच्या चाहत्यांनाही यामुळे विशेष आनंद झाला आहे. कारण देशसेवेत कार्यरत असलेल्या एका महत्त्वाच्या अधिकाऱ्याला त्याच्या चित्रपटातील कथा भावली आहे.

Sofia Qureshi
Pune News: भारतात राहून पाकिस्तानचा जयजयकार; पुण्याच्या तरूणीला ५ दिवसांची कोठडी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com