Nigeria Fuel Tanker- Truck Accident:  Saamtv
देश विदेश

Nigeria Accident: तेल टँकर- ट्रकची धडक अन् भीषण स्फोट, ४८ जण ठार; ५० गुरे जिवंत जळाली

Gangappa Pujari

Nigeria Road Accident: पश्चिम आफ्रिकेतील देश असलेल्या नायजेरियामधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. नायजेरियात रविवारी इंधनाचा टँकर आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातानंतर झालेल्या भयंकर स्फोटात 48 जणांचा मृत्यू झाला. तर या दुर्घटनेत ५० हून अधिक गुरे जिवंत जळाली. अपघातस्थळी सध्या बचावकार्य सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नायजेरियामध्ये इंधन टँकर आणि दुसऱ्या ट्रकमध्ये जोरदार धडक झाली, या धडकेनंतर मोठा स्फोट झाला. या स्फोटात 48 जणांचा मृत्यू झाला आहे. इंधन टँकर उत्तर-मध्य नायजर राज्याच्या अगाई प्रदेशात जात होता तर दुसऱ्या ट्रकमध्ये गुरे भरली होती. ही घटना इतकी भयंकर होती की यामध्ये ५० हून अधिक गुरेही जिवंत जळाली. देशाच्या आपत्कालीन सेवा एजन्सीने ही माहिती दिली.

नायजर राज्य आपत्कालीन व्यवस्थापन संस्थेचे महासंचालक अब्दुल्लाही बाबा-अरब यांनी सांगितले की, सुरुवातील 30 मृतदेह सापडल्याची पुष्टी केली होती, पण नंतर आणखी 18 मृतदेह सापडल्याची माहिती दिली. या सर्व मृतांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. अपघातानंतर लोकांमध्ये वाढत असलेला संताप पाहून नायजरचे गव्हर्नर मोहम्मद बागो यांनी लोकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे, तसेच अशा घटना टाळण्यासाठी अपघाताचे नियम पाळण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, नायजेरियामध्ये माल वाहतूक करण्यासाठी सक्षम रेल्वे व्यवस्था नाही, ज्यामुळे आफ्रिकेतील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशात जीवघेणे ट्रक अपघात सामान्य झाले आहेत. नायजेरियाच्या फेडरल रोड सेफ्टी कॉर्प्सच्या मते, एकट्या 2020 मध्ये पेट्रोल टँकरचे 1531 अपघात झाले, ज्यामध्ये 535 लोकांचा मृत्यू झाला आणि 1142 लोक जखमी झाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

Employees Provident Fund: PF खातेधारकांसाठी मोठी बातमी; पीएफमधून काढता येणार १ लाख रुपये

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

SCROLL FOR NEXT