Nagpur News : पोहण्याचा मोह जीवावर बेतला! नदीपात्रात बुडून २ शाळकरी मुलांचा मृत्यू

School children died after drowning in river : नागपूरमध्ये नदीपात्रात बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. दोघेही आठवीमध्ये शिकत होते.
शाळकरी मुलांचा मृत्यू
Nagpur NewsSaam Tv
Published On

पराग ढोबळे, साम टीव्ही नागपूर

नदीपात्रात बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाल्याची घटना नागपूरमध्ये घडलीय. सुट्टी असल्यामुळे दोघेही पोहायला नदीवर गेले होते. परंतु पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे एक मित्र पाण्यात बुडायला लागला, त्यामुळे दुसरा मित्र त्याला वाचवायला गेला. परंतु, नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. या दोघांचाही पाण्यात बुडाल्यामुळे मृत्यू झालाय.

नदीपात्रात बुडून शाळकरी मुलांचा मृत्यू

नागपूर जिल्ह्यातील रामटेक पोलीस स्टेशन हद्दीत ही धक्कादायक घटना घडली (Nagpur News) आहे. महादूला येथे पोहण्याच्या मोहात दोन शाळकरी मुलांनी जीव गमावला आहे. वृषभ राजेंद्र गाडगे आणि रोहन सुभाष साऊसाखडे अशी मृतक मुलांची नावे आहे. ते दोघेही इयत्ता ८ व्या वर्गात शिकत होते. दोघांची घट्ट मैत्री होती. काल सकाळी अकरा वाजता ही घटना घडलेली आहे.

पाण्यात उतरण्याचा मोह

काल ७ सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाची सुट्टी (died after drowning in river) होती. त्यामुळे गौरी विसर्जनाच्या कार्यक्रमासाठी हे दोघेही महिलांसोबत नदीवर गेले होते. नदीकाठी खेळत असताना पाणी बघून या दोघांनाही पाण्यात उतरण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी पोहण्यासाठी पाण्यात उडी घेतली, परंतु पाण्याचा अंदाज त्यांना आला नाही. त्यामुळे एक मित्र खोल पाण्यात बुडायला लागला. दुसरा मित्र त्याला वाचवण्यासाठी गेला असता, तोही पाण्यात बुडाला.

शाळकरी मुलांचा मृत्यू
Vanraj Aandekar Death: 'मारा मारा... दोघांनाही सोडू नका', वनराज आंदेकरांच्या बहिणीनेच दिली चिथावणी; त्या दिवशी नेमकं काय घडलं?

शोधमोहिमेनंतर मृतदेह सापडले

काल सकाळी अकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली (Ramrtek Police Station Area) होती. परंतु, काल उशिरापर्यंत शोध मोहिम सुरू होती, तरी यांचे मृतदेह सापडले नव्हते. आज ८ सप्टेंबर रोजी सकाळपासून गोताखोर आणि एसडीआरएफ पथकाकडून पुन्हा शोधमोहीम राबवली गेली, तेव्हा दोघांचे मृतदेह (Death) मिळून आलेत. या घटनेनंतर दोन्ही मुलांच्या कुटुंबीयांवर मात्र दु:खाचा डोंगर कोसळलेला आहे. नदीकाठी गेल्यानंतर खोलीचा अंदाज घेवूनच पाण्यात उतरणे गरजेचे आहे, अन्यथा अनर्थ होवू शकतो.

शाळकरी मुलांचा मृत्यू
Gadchiroli Child Death Case : चिमुकल्या भावंडांचा मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; आरोग्य अधिकाऱ्यांच्या तपासात महत्वाची माहिती उघड

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com