Gadchiroli Child Death Case : चिमुकल्या भावंडांचा मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; आरोग्य अधिकाऱ्यांच्या तपासात महत्वाची माहिती उघड

Gadchiroli news update : गडचिरोलीतील चिमुकल्या भावंडांचा मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. आरोग्य अधिकाऱ्यांच्या तपासात महत्वाची माहिती हाती आली आहे.
चिमुकल्या भावंडांचा मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; आरोग्य अधिकाऱ्यांच्या तपासात महत्वाची माहिती उघड
Gadchiroli Child Death CaseSaam tv
Published On

मंगेश भांडेकर, साम टीव्ही प्रतिनिधी

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील पत्तीगावातील चिमुकल्या भावंडांच्या प्रकरणी मोठी अपडेट हाती आली आहे. चिमुकल्या भावंडांच्या मृत्यू प्रकरणात कुटुंबीयांनी सर्वप्रथम पुजाऱ्यांकडे उपचारासाठी नेल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुजाऱ्याने केलेल्या जडीबुटीच्या उपचारानेच चिमुकल्या भावंडांचा मृत्यू झाला काय, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

गडचिरोलीतील अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा प्राथमिक आरोग्य केंद्रात चिमुकल्या भावंडांना आणण्यात आलं. ही चिमुकले मृतावस्थेत होती. जिमलगट्टामधील स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ही मेडिको लीगल केस असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी पोस्टमार्टम आवश्यक असल्याचे पालकांच्या लक्षात आणून दिले. त्यानंतर त्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यालाही सूचना दिली. मात्र, पोस्टमार्टम करण्यास चिमुकल्यांचे कुटुंबीय इच्छुक नव्हते. त्यानंतर त्यांनी गावी जाणे पसंत केल्याचेही निष्पन्न झाले.

चिमुकल्या भावंडांचा मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; आरोग्य अधिकाऱ्यांच्या तपासात महत्वाची माहिती उघड
Pune Crime: धक्कादायक! उलटी केल्यामुळे गर्लफ्रेंडच्या मुलासोबत केलं भयंकर कृत्य, बॉयफ्रेंडला अटक

आरोग्य अधिकाऱ्यांनी शववाहिका उपलब्ध करून देण्याचीही तयारी दर्शवली होती. मात्र कुटुंबीयांनी रुग्णवाहिकेची प्रतीक्षा न करता तब्बल 15 किलोमीटरवर मुलांचे मृतदेह खांद्यावर घेऊन पायदळ प्रवास केला. याप्रकरणी सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणात चौकशी समिती गठित करून विस्तृत अहवाल मागविला आहे.

शासकीय वसतिगृहाच्या इमारतीचा सज्जा कोसळून मजूर ठार

गडचिरोलीतील अहेरी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत मुलचेरा येथे बांधण्यात येत असलेल्या शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहाचा सज्जा कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत गुरुवारी युवा मजुराचा मृत्यू झाला. गितेश ललीत मिस्त्री असे मृत मजुराचे नाव आहे. 25 कोटी रुपये खर्चून शासकीय आश्रमशाळा आणि वसतिगृहाचे बांधकाम करण्यात येत आहे.

चिमुकल्या भावंडांचा मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; आरोग्य अधिकाऱ्यांच्या तपासात महत्वाची माहिती उघड
Nashik Crime News : नाशिक हादरले..क्षुल्लक कारणातून प्रियकराने चिमुकल्याला संपवले

नेमकं काय घडलं?

आज गुरुवारी गितेश मिस्त्री हा इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावर काम करीत होता. परंतु अचानक सज्जा कोसळल्याने तो खाली पडला. डोक्याला जबर मार लागल्याने गितेशचा मृत्यू झाला. मुलचेरा पोलिस घटनेचा तपास करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com