Nashik Crime News : नाशिक हादरले..क्षुल्लक कारणातून प्रियकराने चिमुकल्याला संपवले

Nashik News : लिव्ह इन रिलेशन शिपमध्ये नाशिक शहरात मागील आठ दिवसात दोन हत्या झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
Nashik Crime News
Nashik Crime NewsSaam tv
Published On

तबरेज शेख 
नाशिक
: नाशिक शहर पुन्हा एका धक्कादायक घटनेने हादरले आहे. लिव्ह इन रिलेशन शिपमध्ये राहत असलेल्या प्रियकराने एका क्षुल्लक कारणातून प्रेयसीच्या मुलाला निर्दयीपणे मारहाण केली. यात चार वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना नाशिकच्या पंचवटी परिसरात घडली आहे. 

लिव्ह इन रिलेशन शिपमध्ये नाशिक (Nashik) शहरात मागील आठ दिवसात दोन हत्या झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यात पहिल्या घटनेत आठ दिवसांपूर्वी ३५ वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली होती. तर दुसऱ्या घटनेत चार वर्षीय चिमुकल्याची हत्या करण्यात आली आहे. लिव्ह इन रिलेशन शिपमध्ये राहणाऱ्या प्रेयसीचा मुलगा वारंवार उलटी करतो. या गोष्टीचा राग आलेल्या निर्दयी प्रियकराने (Crime News) चार वर्षीय चिमुकल्याला झाडूने मारहाण केली. यात हा चिमुकला बेशुद्ध पडला होता. दरम्यान या घटनेत त्याचा मृत्यू झाला आहे. 

Nashik Crime News
Palghar Crime : पैशांसाठी भाडेकरूचे भयानक कृत्य; वाडा तालुक्यातील तिहेरी हत्याकांडाबाबत धक्कादायक माहिती आली समोर

वेदांश वीरभद्र काळे असे या घटनेत मृत्युमुखी झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे. मारहाण केल्याने बेशुद्ध पडल्यावर त्याला रुग्णालयात नेले. त्याच्यावर पुणे जिल्ह्यात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी अगोदर पुणे येथील बिबवेवाडी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र  घटना नाशिकच्या पंचवटीत घडल्याने हा गुन्हा पंचवटी पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला असून याप्रकरणी संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com