Crime News  Saam Tv
देश विदेश

Shocking: शिक्षकाने ८९ मुला-मुलींवर केला बलात्कार, 'त्या' एका पेन ड्राइव्हमुळे विकृत चेहरा आला जगासमोर

France Crime News: फ्रान्समधील एका शिक्षकाने ८९ मुलांवर बलात्कार केला. यामध्ये फक्त मुलीच नाही तर मुलांचा देखील समावेश आहे. या शिक्षकाच्या पुतण्यानेच त्याचा खरा चेहरा जगासमोर आणला.

Priya More

Summary -

  • फ्रान्समधील शिक्षकावर ८९ अल्पवयीन मुलांवर अत्याचार केल्याचा आरोप

  • ९ देशांमध्ये गुन्हे केल्याची कबुली डिजिटल नोंदीतून समोर

  • पुतण्याला सापडलेल्या पेन ड्राइव्हमुळे हे प्रकरण उघड झाले

  • आतापर्यंत ४० पीडितांची ओळख पटली आहे

फ्रान्समधील एका शिक्षकाने तब्बल ८९ अल्पवयीन मुलांवर बलात्कार आणि लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्याने ज्या मुलांवर लैंगिक अत्याचार केले त्यामध्ये फक्त मुलीच नाही तर मुलांचा देखील समावेश आहे. ७९ वर्षीय या शिक्षकाने १९६७ ते २०२२ या कालावधीमध्ये ९ देशांमधील मुलांना टार्गेट करत त्यांच्यावर बलात्कार केला. जॅक्स लेवेगले असं या आरोपीचे नाव आहे. त्यांच्या पुतण्यामुळे हे धक्कादायक प्रकरण समोर आले. पुतण्याने आरोपीच्या कृत्याची माहिती देणारी कागदपत्रे पोलिसांसमोर सादर केली.

द गार्डियनच्या वृत्तानुसार, आरोपी जॅक्स लेवेगले हा शिक्षक आणि स्पेलिओलॉजी प्रशिक्षक होता. जर्मनी, स्वित्झर्लंड, मोरोक्को, नायजर, अल्जेरिया, फिलीपिन्स, भारत, कोलंबिया आणि फ्रेंच प्रांत न्यू कॅलेडोनिया याठिकाणी मुलांना शिकवताना त्याने त्यांच्यासोबत भयंकर कृत्य केले. आरोपीने १३ ते १७ वयोगटातील मुलांना टार्गेट करत त्यांच्यावर बलात्कार आणि लैंगिक अत्याचार केले.

आरोपीने एका यूएसबी ड्राइव्हमध्ये संकलित केलेल्या लेखनातून किती जणांवर त्याने बलात्कार केला होता याची संख्या समोर आली. ज्यामध्ये १३ ते १६ वयोगटातील अल्पवयीन मुलांसोबत लैंगिक संबंध ठेवल्याचा उल्लेख केला आहे. या व्यक्तीने त्याच्या यूएसबी ड्राइव्हवर जी कागदपत्रं जमा करून ठेवली होती ती त्याच्या पुतण्याला सापडली आणि त्यानंतर त्याने ती सर्वांसमोर आणली.

ऑक्टोरबर २०२३ मध्ये लेवेगले घरात नसताना पुतण्याने त्याच्या खोलीची तपासणी केली तेव्हा त्याला यूएसबी ड्राइव्ह सापडले. या ड्राइव्हमध्ये एक डिजिटल मेमोयर होते. ते तपासल्यानंतर त्यामधून लेवेगलेने अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या तरुणाने हा यूएसबी ड्राईव्ह पोलिसांच्या स्वाधीन केला. त्यानंतर त्याला २०२४ मध्ये अटक करण्यात आली.

ज्या ८९ अल्पवयीन मुलांवर त्याने बलात्कार केला होता त्यापैकी ४० जणांची ओळख पटली आहे. अनेकांची पूर्ण नावं नाहीत. या सर्व पीडितांना पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आरोपी लेवेगलचे फोटो त्याच्या विविध टाइमलाइनवरून शेअर करण्यात आले आहे जेणेकरून त्याची ओळख पटेल. हे फोटो पाहून त्याने ज्या मुलांवर अत्याचार केले होते त्यांची नावं समोर यावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

Bhindi health benefits: भेंडी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT