Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य तयार करा

प्लम केक बनवण्यासाठी १ कप मैदा, अर्धा कप साखर, अर्धा कप बटर, २ अंडी, अर्धा कप दूध, १ चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा दालचिनी पावडर, अर्धा कप मनुका, चिरलेले काजू-बदाम आणि थोडे टूटी-फ्रूटी घ्या.

Plum Cake | Yendex

ड्रायफ्रूट्स तयार करा

मनुका, काजू, बदाम आणि इतर ड्रायफ्रूट्स बारीक चिरून घ्या. केकमध्ये ड्रायफ्रूट्सची चव अधिक छान लागण्यासाठी ते थोडे मैद्यात घोळवून घ्या. त्यामुळे ते केकमध्ये समान पसरायला मदत होते.

Plum Cake | Yendex

बटर आणि साखर फेटून घ्या

एका भांड्यात बटर आणि साखर एकत्र करून चांगले फेटा. मिश्रण हलके आणि मऊ झाल्यानंतर त्यात अंडी एकेक करून घाला आणि पुन्हा फेटून घ्या.

Plum Cake | yandex

मैदा आणि इतर साहित्य मिसळा

आता या मिश्रणात चाळलेला मैदा, बेकिंग पावडर आणि दालचिनी पावडर घाला. त्यानंतर दूध घालून सर्व साहित्य हलक्या हाताने एकत्र करा. शेवटी तयार केलेले ड्रायफ्रूट्स घाला.

Plum Cake Recipe

केकचा साचा तयार करा

केकच्या साच्याला बटर लावून त्यात थोडा मैदा भुरभुरा किंवा बटर पेपर लावा. तयार मिश्रण साच्यात ओता आणि वरून हलके टॅप करा, जेणेकरून हवेचे मोठे बुडबुडे निघून जातील.

Plum Cake Recipe

कुकरमध्ये केक बेक करा

कुकरमध्ये स्टँड ठेवा आणि झाकणाची शिट्टी व रबर काढून घ्या. कुकर ५ मिनिटे मंद आचेवर गरम करा. त्यानंतर केकचे मिश्रण बटर लावलेल्या भांड्यात ओतून ते स्टँडवर ठेवा. कुकरचे झाकण उलटे बंद करुन मंद आचेवर साधारण ३५ ते ५० मिनिटे बेक करा. टूथपिक घालून तपासा.

Plum Cake Recipe

थंड करून सर्व्ह करा

केक बेक झाल्यानंतर तो पूर्णपणे थंड होऊ द्या. त्यानंतर साच्यातून बाहेर काढून त्याचे तुकडे करा. गरम चहा किंवा कॉफीसोबत हा मऊ आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक सर्व्ह करा.

Plum Cake Recipe

Party Wear Blouse: पार्टी वेअर साडीला मिळेल खास लूक! ब्लाउज हे 7 फॅन्सी डिझाइन्स नक्की ट्राय करा

Party Wear Blouse | Saam Tv
येथे क्लिक करा