Shruti Vilas Kadam
ब्लाउजच्या हातांवर पट्ट्यांचे डिझाइन करून घेऊ शकता. साध्या रंगाच्या ब्लाउजवर हे डिझाइन छान दिसते. हातांवर छोटे फ्लोरल बीड्स लावल्यास त्यांना आणखी आकर्षक लूक मिळू शकतो.
ब्लाउजच्या हातांवर बो म्हणजेच फुलपाखरासारखी गाठ आणि फ्रिलचा वापर करू शकता. हे डिझाइन मॉडर्न दिसते. पार्टीवेअर साडीवर असे हात उठून दिसतात.
पफ स्लीव्ह्जमुळे ब्लाउजला पारंपरिक आणि स्टायलिश लूक मिळतो. शिफॉन किंवा जॉर्जेटसारख्या हलक्या कापडाच्या ब्लाउजवर या डिझाईन्स छान दिसतात.
हाफ स्लीव्ह्ज आवडत असतील, तर फ्लॅप डिझाइन ट्राय करा. हातांच्या कडेला साडीशी जुळणारी लेस लावल्यास ब्लाउज अधिक आकर्षक दिसतो.
सिल्क आणि बनारसी साड्यांवर डिझाइनदार हात सुंदर दिसतात. साडीच्या रंगाशी जुळणारी लेस किंवा बॉर्डर लावल्यास ब्लाउजला उठावदार लूक मिळतो.
ब्लाउजच्या हातांसाठी साडीशी जुळणारे नेटचे कापड वापरू शकता. त्यावर स्टोनवर्क असलेली लेस लावल्यास हात अधिक आकर्षक दिसतात. लग्न आणि पार्टीसाठी हा पर्याय छान आहे.
नेटच्या कापडापासून पफ स्लीव्ह्ज तयार करून त्यावर हेवी बॉर्डर लावता येतो. हे डिझाइन विशेषतः हेवी पार्टीवेअर साडीवर सुंदर दिसते आणि ब्लाउजला फॅन्सी लूक देते.