Shreya Maskar
झोपण्याआधी अनेकजण गरम दूध पितात. असे मानले जाते की गरम दूध प्यायल्याने गाढ झोप लागते, यामागचे नेमकं सत्य जाणून घेऊयात.
दुधामध्ये ट्रिप्टोफॅन हे अमिनो ॲसिड असते. शरीरात त्याचा उपयोग सेरोटोनिन आणि मेलाटोनिनच्या निर्मितीसाठी होतो. हे झोपेच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतात.
झोपण्यापूर्वी गरम दूध पिण्याची सवय काही लोकांना आरामदायी वाटू शकते. त्यामुळे झोपेची तयारी करण्यास मदत होते. अनेक लोक हळद घातलेले दूध देखील पितात.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, गरम दूध थंड दुधापेक्षा झोपेसाठी अधिक प्रभावी ठरते. मात्र जास्त गरम दूध न पिता, हलके कोमट दूध घ्यावे.
गरम दूध प्यायल्याने झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. मनाला आणि मज्जासंस्थेला आराम देतो, ज्यामुळे लवकर झोप लागते.
झोपण्यापूर्वी थोडे दूध प्यायल्याने भूक कमी होण्यास मदत होऊ शकते. मात्र, जास्त दूध प्यायल्यास पोट जड वाटू शकते.
झोपण्याच्या साधारण ३०–६० मिनिटे आधी कोमट दूध प्यावे. तसेच दररोज ठरावीक वेळी झोपण्याची आणि उठण्याची सवय लावा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.