Shreya Maskar
शेवग्याची पाने पोषक तत्त्वांनी समृद्ध असतात. यात जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असते.
शेवग्याच्या पानांमधील फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते. मात्र रक्तदाब किंवा कोलेस्टेरॉलची समस्या असलेल्या लोकांनी याचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
शेवग्याची पाने तुलनेने कमी कॅलरीची असून त्यात फायबर असते. संतुलित आहार आणि नियमित व्यायामासोबत त्यांचा समावेश केल्यास वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
शेवग्याच्या पानांमध्ये फायबर असते. योग्य प्रमाणात फायबर घेतल्याने पचनक्रिया सुरळीत राहण्यास आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते.
शेवग्याच्या पानांमध्येबीटा-कॅरोटीन असते, ज्याचे शरीरात जीवनसत्त्व अ मध्ये रूपांतर होते. जीवनसत्त्व अ सामान्य डोळ्यांची दृष्टी टिकवण्यासाठी महत्त्वाचे आहे.
तुम्ही जेवणासाठी शेवग्याच्या पानांची भाजी, शेवग्याच्या पानांची डाळ बनवू शकता. तसेच नाश्त्याला शेवग्याच्या पानांचे थालीपीठ, शेवग्याच्या पानांचे पराठे आणि शेवग्याच्या पानांचे मूग चिल्ले बनवा. शेवग्याच्या पानांची चटणीसोबत हे छान लागतील.
तसेच तुम्ही शेवग्याच्या पानांची आमटी आणि शेवग्याच्या पानांचे सूप पिऊ शकता. या दोन्ही रेसिपी आजारपणात खूप फायदेशीर ठरतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.