Shreya Maskar
केळीमध्ये पोटॅशियम, कर्बोदके आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे शरीरातील ऊर्जेची पातळी दीर्घकाळ टिकून राहते.
व्यायामापूर्वी ३० ते ४० मिनिटे आधी केळी खाणे आरोग्यास फायदेशीर ठरते. हे स्टॅमिना वाढवते आणि तीव्र व्यायामानंतर शरीराला सावरण्यास मदत करते.केळीमधील पोटॅशियम स्नायूंना येणारे क्रॅम्प्स टाळण्यास मदत करते.
रात्रीच्या जेवणानंतर केळी पचायला जड असतात. विशेषतः ज्यांना पचनाच्या समस्या आहेत किंवा ज्यांचे पोट संवेदनशील आहे, त्यांच्यासाठी हे त्रासदायक ठरू शकते.
मधुमेह असलेल्या व्यक्तींनीही रात्रीच्या वेळी केळी खाणे टाळा. कारण यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, शरीराला ऊर्जा मिळवण्यासाठी व्यायामापूर्वी किंवा नंतर खावे. सकाळी नाश्त्यासोबत किंवा सकाळच्या नाश्त्यानंतरच्या वेळी केळी खाणे फायदेशीर राहते.
रात्रीच्या वेळी केळी खाणे टाळावे, कारण ती पचायला जड असू शकतात. रिकाम्या पोटी केळी खाल्ल्याने ॲसिडिटीसारख्या समस्या उद्भवू शकतात.
सुका मेवा, ओट्स , दूध , दही खाल्ल्यावर काही वेळाने तुम्ही केळी खाऊ शकता.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.