Shreya Maskar
मधामध्ये ग्लुकोज नैसर्गिक साखर असते, त्यामुळे मध घातलेला चहा प्यायल्याने शरीराला तात्पुरती ऊर्जा मिळते.
मधामुळे घशातील खवखव कमी होण्यास आणि खोकला कमी होण्यास मदत मिळते. विशेषतः कोमट चहामध्ये मध घातल्यास घशाला आराम मिळतो.
मधामध्ये काही प्रमाणात अँटिऑक्सिडंट घटक असतात. थोडासा मध घातलेला चहा प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास आणि शरीर डिटॉक्स होण्यास मदत मिळते.
सकाळी एक ग्लास पाणी प्यायल्यावर तुम्ही मधाचा चहा पिऊ शकता. रिकाम्या पोटी मधाचा चहा प्यायल्याने ॲसिडिटीचा त्रास उद्भवतो. छातीत जळजळ किंवा पोटात अस्वस्थता वाढू शकते.
तुम्हाला जर मधुमेहाचा त्रास असेल तर मधाची चहा पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मधामुळेही रक्तातील साखर वाढू शकते.
साखरेपेक्षा मधामध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतो. मध वजन कमी करण्यासाठी मदत करते. पोटाची अतिरिक्त चरबी जाळली जाते.
चहात नेहमी साखर घालत असाल, तर कमी प्रमाणात मध वापरू शकता. परंतु मधामध्येही साखर आणि कॅलरी असतात. त्यामुळे मधाचे सेवनही नियंत्रणात करावे. तोंड किंवा घसा भाजण्याचा धोका कमी करण्यासाठी खूप गरम आणि उकळलेला चहा पिऊ नका.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.