Shreya Maskar
दैनंदिन सवयींमुळे गुडघेदुखीची समस्या उद्भवते. गुडघ्यात थोडे दुखणे म्हणून जे सुरू होते त्याचे हळूहळू तीव्र वेदनेत रुपांतर होते.
खूप वेळ हालचाल न करता एकाच स्थितीत बसून राहिल्यामुळे हिप्स आणि पायांची ताकद कमी होते. कारण त्यांच्यावर कोणतेही वजन पडत नाही, परिणामी स्नायूंची ताकद कमी होते.
जर तुमच्या चप्पला पायांना आणि तळव्यांना योग्य आधार देत नसतील तर त्या वेळीच बदला. पायांच्या तळव्यांना योग्य आधार मिळाला नाही तर शरीराचे वजन गुडघ्याच्या सांध्यांवर समान रीतीने विभागले जात नाही, ज्यामुळे गुडघ्यांवर अतिरिक्त ताण येतो.
जर तुम्ही शारीरिक हालचालींमध्ये अचानक वाढ केली तर गुडघ्यांना दुखापत होऊ शकते. अचानक अति व्यायाम करणे, धावपळ करणे यामुळे गुडघ्यांवर ताण वाढतो.
गुडघे, सांधे आणि स्नायूंना पुरेशी ताकद मिळण्यासाठी पाणी खूप गरजेचे असते. डिहायड्रेशनमुळे गुडघेदुखी वाढते.
पायांचे स्नायू कमकुवत असल्यास गुडघ्यांवर अधिक ताण येतो, ज्यामुळे कालांतराने कोणतीही हालचाल करणे कठीण होऊ शकते. गुडघ्यांची स्थिती विस्कळीत होते आणि त्यांच्यावर अतिरिक्त भार पडतो.
गुडघ्यांवरील भार कमी करण्यासाठी रोज १५-२० मिनिटे व्यायाम करा. स्क्वॉट्स, पळणे यांसारखे व्यायाम करा. गुडघ्यांचे व्यायाम करा. यासंबंधित फिटनेस ट्रेनरशी संपर्क साधा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.