Shreya Maskar
हार्ट अटॅक म्हटले की सर्वप्रथम छातीत तीव्र वेदना हेच आपल्या डोक्यात येते. मात्र महिलांमध्ये छातीत दुखण्यासोबत किंवा त्याशिवाय इतर अनेक धोक्याचे संकेत पाहायला मिळतात, जे हृदयविकाराच्या झटक्याचा इशारा देतात.
नेहमीची कामे करताना अचानक धाप लागणे. तसेच अचानक श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.
पुरेशी झोप घेऊनही थकवा जाणवतो, अचानक शक्ती कमी झाल्यासारखे वाटत, रोजची कामे करणे कठीण होते.
काही महिलांना हार्ट अटॅकदरम्यान मळमळ, उलटी, पोटाच्या वरच्या भागात अस्वस्थता जाणवू शकते. ही लक्षणे अॅसिडिटीसारखी वाटू शकतात, त्यामुळे इतर लक्षणांसोबत दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका.
कोणतेही स्पष्ट कारण नसताना थंड घाम फुटणे, त्वचा ओलसर होणे आणि अस्वस्थ वाटणे ही हृदयविकाराच्या झटक्याची चिन्हे असू शकतात. विशेषतः यासोबत चक्कर किंवा धाप लागल्यास सतर्क व्हा.
अचानक चक्कर येणे, डोके हलके झाल्यासारखे वाटणे किंवा बेशुद्ध पडणे ही लक्षणे अनेक कारणांनी होऊ शकतात. एकदा वैद्यकीय तपासणी करा.
हार्ट अटॅकदरम्यान पाठ, मान, खांदा, जबड्यात वेदना अथवा दडपण जाणवू शकते. तुम्हाला शरीरात एक जडपणा वाटू लागले.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.