Heart Attack : हार्ट अटॅक येण्यापूर्वी हातात दिसतात 'ही' लक्षणे, वेळीच ओळखलात तर वाचेल जीव

Shreya Maskar

हार्ट अटॅक

बदलत्या जीवनशैलीमुळे हार्ट अटॅकचे प्रमाण वाढताना दिसत आहे. शरीरातील छोट्या छोट्या बदलांकडे दुर्लक्ष करू नका आणि वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Opinion of health experts | pinterest

आरोग्य तज्ज्ञांचे मत

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, डाव्या हातातील वेदना हे हार्ट अटॅकचेही एक लक्षण असू शकते. यात डाव्या हातात अचानक वेदना होणे, खांद्यापासून हातापर्यंत दुखणे, हात जड होणे यांचा समावेश आहे.

Pain in left arm | pinterest

डाव्या हातात वेदना

हार्ट अटॅकच्या वेळी हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा कमी होतो , त्यामुळे छातीत वेदना किंवा दाब जाणवतो. या वेदना दोन्ही किंवा डाव्या हातात, खांद्यांत, पाठीत, मानेत किंवा जबड्यात पसरू शकतात.

Pain in left arm | pinterest

स्नायूदुखी

स्नायूदुखीमध्ये हात हलवल्यावर, एखाद्या ठिकाणी दाब दिल्यावर वेदना वाढू शकतात. व्यायाम किंवा दुखापतीनंतरही असे होऊ शकते.

Muscle pain | pinterest

हार्ट अटॅकची शक्यता

हातातील वेदनांसोबत छातीत दाब, धाप लागणे, थंड घाम, मळमळ जाणवत असेल तर हा हार्ट अटॅकचा इशारा आहे.

Possibility of heart attack | pinterest

तपासणी करा

केवळ वेदनांचे स्वरूप पाहून हार्ट अटॅक आहे की नाही, हे निश्चित करता येत नाही. त्यासाठी वैद्यकीय तपासणी, ECG आणि आवश्यक रक्ततपासण्या करून घ्या.

ECG | pinterest

अवयवांमध्ये वेदना

हृदयविकाराशी संबंधित वेदना शरीराच्या इतर भागांतही जाणवू शकतात. जबडा, मान, पाठीचे दुखणे वाढते. तसेच धाप लागणे, मळमळ, पाठदुखी किंवा असामान्य थकवा अशी लक्षणेही जाणवतात.

Pain in limbs | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Heart Attack | AI PHOTO
येथे क्लिक करा...