PAK PM Saam
देश विदेश

Pakistan News: 'भारताशी पंगा नको, तर...', पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांचा शाहबाज शरीफ यांना सल्ला

Former Pakistan PM Nawaz Sharif: सिंधू पाणी करार स्थगित केल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी विद्यमान पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची भेट घेतली.

Bhagyashree Kamble

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने सिंधू पाणी करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला. यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी विद्यमान पंतप्रधान आणि त्यांचे बंधू शाहबाज शरीफ यांना सल्ला दिला. तणाव न वाढवता राजनैतिक मार्गाने तोडगा काढण्याचा सल्ला दिल्याची माहिती पाकिस्तानी माध्यमांनी दिली आहे.

'द एक्सप्रेस ट्रिब्यून' या पाकिस्तानी वृत्तपत्रानुसार, नवाज शरीफ यांनी शाहबाज शरीफ यांना भारतासोबत संघर्ष वाढवू नये असा सल्ला दिला आहे. तसेच चांगले संबंध ठेवण्याचाही सल्ला दिला आहे. या संदर्भात पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी नवाज शरीफ यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या बैठकीत त्यांनी सल्ला दिल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीला पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाजही उपस्थित होत्या.

बैठकीत शाहबाज शरीफ यांच्याकडून सिंधू पाणी करार स्थगित करण्याचे वृत्त ऐकल्यानंतर नवाज शरीफ यांनी त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला. तसेच वादग्रस्त विधाने करू नयेत असा सल्ला मंत्री आणि अन्य नेत्यांना दिला. युद्ध झाले तरी, सर्वाधिक नुकसान पाकिस्तानचे होईल, त्यामुळे शांत राहणे योग्य, असं नवाज शरीफ यांनी म्हटलं आहे.

नवाज आणि शाहबाज यांच्या भेटीदरम्यान उपस्थित असलेल्या अधिकाऱ्याने माध्यमांशी बोलताना सांगितलं की, नवाज यांचा प्रयत्न भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये संवाद निर्माण करण्याचा आहे. भारताविरोधात आक्रमक भूमिका घेण्यास नवाज शरीफ तयार नसल्याचेही त्या अधिकाऱ्याने स्पष्ट केलं.

कोणताही संघर्ष विनाशकारी

शाहबाज शरीफ यांनी नवाज शरीफ यांना सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर निर्माण होणाऱ्या संभाव्य परिस्थितीची माहिती दिली. सध्याची स्थिती दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य असल्याचे त्यांनी सांगितलं. यावर प्रतिक्रिया देताना नवाज शरीफ म्हणाले, भारत आणि पाकिस्तान या दोघांकडेही अण्वस्त्र आहेत, त्यामुळे कोणताही संघर्ष विनाशकारी ठरू शकतो. अशा परिस्थितीत संवाद हाच एकमेव मार्ग असल्याचा सल्ला त्यांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT