BJP Leader Saam
देश विदेश

BJP Crime: धक्कादायक! भाजप नेत्याची दिवसाढवळ्या हत्या, शेतातून परतताना धारदार शस्त्राने वार

BJP Leader Surendra Mewara killed: भारतीय जनता पक्षाचे नेते सुरेंद्र मेवारा यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला करून त्यांची निर्घृण हत्या केली. सकाळी साडेसातच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली.

Bhagyashree Kamble

राजस्थानमधील झालावाडमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते सुरेंद्र मेवारा यांची अज्ञात हल्लेखोरांकडून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मांडावर गावातील शेतातून परत येत असताना त्यांच्यावर हल्ला झाला. हल्लेखोरांनी आधी धारदार शस्त्रांनी वार करून त्यांना जखमी केलं. नंतर तेथून पळ काढला. रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या मेवारा यांना तातडीने रूग्णालयात नेण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ७ वाजवण्याच्या सुमारास मेवारा आपल्या शेतातून येत होते. यावेळी अज्ञातांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केला. यामुळे मेवारा रक्तबंबाळ होऊन खाली पडले. कुटुंबातील सदस्य आणि ग्रामस्थांनी मिळून त्यांना झालावड येथील खासगी रूग्णालयात नेले. परंतु डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. घटनास्थळी मोठ्या संख्येनं लोक जमले होते. त्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. सध्या हत्येमागील कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

सुरेंद्र मेवारा यांचे नाव यापूर्वी सत्तू चौधरी हत्याकांडात चर्चेत आलं होतं. त्या प्रकरणात त्यांना कनिष्ठ न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती, परंतु नंतर उच्च न्यायालयाने जामीन दिला. स्थानिक राजकारणात त्यांची बडदास्त होती, त्यामुळे या हल्ल्यामागे वैयक्तिक किंवा राजकीय शत्रुत्व असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना कर्ज नाही; अजित पवारांचं आश्वासन हवेत विरलं, कारण काय?

Maharashtra Live News Update: आज राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र; तब्बल १९ वर्षानंतर एकत्र

Saturday Horoscope : मोठी स्वप्न पूर्ण होतील, दिवस चांगला जाणार; ५ राशींच्या लोकांचं नशीब उजळणार

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

SCROLL FOR NEXT