
सध्या सोन्याच्या दरात चढ उतार पाहायला मिळत आहे. मध्यंतरी १० तोळं सोन्याचा दर १ लाखांवर पोहोचला होता. भारत - पाकमधील युद्धस्थितीच्या तणावानंतर सोन्याच्या दरात घसरण झाली. सोन्याच्या दरात वाढ झाल्यानंतर ग्राहकांनी सराफाच्या दुकानाकडे पाठ फिरवली. मात्र, दर जसे घसरले, तसं ग्राहकांनी सोनं पुन्हा खरेदी करण्यास सुरूवात केली.
पण एक असा काळ होता, जेव्हा १ तोळं सोनं फक्त ११३ रूपयांना मिळत होतं. याचे बिल सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर सध्या १९५९ साल पूर्वीचा एका ज्वेलरी दुकानाच्या बिलाचा फोटो जोरदार व्हायरल होत आहे. @upscworldofficial या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे जुने बिल पोस्ट करण्यात आले आहे. हे बिल वामन निंबाजी अष्टेकर नावाच्या दुकानाचे असून, ग्राहकाचे नाव शिवलिंग आत्माराम असे दिसत आहे.
या बिलात १ तोळं सोन्याची किंमत दिली आहे. आजकाल एक तोळं सोनं खरेदीसाठी ग्राहकांना ७० हजारहून अधिक पैसे मोजावे लागतात. पण कल्पना करा, ६६ वर्षांपूर्वी १ तोळं सोन्याची किंमत किती असेल, याचा विचार आपण कधी केला आहे का? सोशल मीडियावर सध्या एका बिलाचा फोटो व्हायरल होत आहे.
या व्हायरल बिलमध्ये १ तोळं सोन्याची किंमत फक्त ११३ रूपये नमूद करण्यात आली आहे. या ग्राहकाने त्या काळात एकूण ९,९०९ रुपयांच्या सोन्या-चांदीच्या वस्तू खरेदी केल्या होत्या. त्या वेळेसच्या या किंमती पाहून आजच्या महागाईच्या पार्श्वभूमीवर अनेकांना विश्वासच बसत नाही. दरम्यान, या बिलाचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हायरल फोटोवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स
या फोटोखाली अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत, एका नेटकऱ्याने “आज चॉकलेटचे दर सोन्याच्या किमती एवढे आहे,” तर दुसऱ्याने लिहिलं, ११३ रुपये त्या काळातही मोठी रक्कम होती, हे विसरू नका.” तर, आणखी एका नेटकऱ्याने “तेव्हा एक पैसाही मौल्यवान होता, आज १०० पैसे पडले तरी कुणी उचलणार नाही”.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.