Shocking: पत्नीचे दीरासोबत अनैतिक संबंध, बायकोला नको त्या अवस्थेत पाहिलं; संतापलेल्या नवऱ्यानं भावालाच संपवलं

latest crime affair news: आरोपीने आपल्या भावावर पत्नीबरोबर अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत, थेट गोळी झाडून आणि गळा चिरून त्याची हत्या केली. हत्या केल्यानंतर मृतदेह हिंडन नदीत फेकण्यात आला.
Crime News
Crime News Saam Tv
Published On

दीर वहिनीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील एका गावातून समोर आली आहे. एका युवकाने आपल्या वहिनीसोबत अनैतिक संबंध ठेवले होते. याची माहिती पतीला समजताच त्याने आपल्या भावाची गळा चिरून हत्या केली आहे. नंतर मृतदेह हिंडन नदीत फेकून दिले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

नेमकं प्रकरण काय?

हिमांशू असे मृत तरूणाचे नाव आहे. मावस भाऊ (अक्षय) ड्युटीवर असताना तो त्याच्या घरात जायचा. नंतर पत्नीसोबत अनैतिक संबंध ठेवत होता. याची माहिती मिळाल्यानंतर संतापलेल्या पतीने म्हणजेच अक्षयने बदला घेण्याचा कट रचला. अक्षय जेव्हा सुट्टीवरून गावात आला, तेव्हा त्याने आपल्या पत्नीच्या माध्यमातून हिमांशूला घरी बोलावलं.

Crime News
BJP Leader: 'माझा पती दुसऱ्या महिलेसोबत शारीरिक संबंध..' भाजप नेत्याच्या मुलाचे १३० अश्लील व्हिडिओ व्हायरल

हिमांशू घरी पोहोचताच, अक्षयने त्याच्यावर प्रथम गोळी झाडली, आणि नंतर गळा चिरून निर्घृणपणे हत्या केली आणि मृतदेह हिंडन नदीत फेकून दिला. हिमांशू तीन दिवस घरी न परतल्याने कुटुंबीयांनी पोलिसांना याची माहिती दिली. तपासादरम्यान पोलिसांना घटनास्थळी हिमांशूची चप्पल सापडली. या प्रकरणी पोलिसांनी आठ जणांना ताब्यात घेतलं होतं, मात्र अक्षय फरार झाला होता. त्याच्यावर २५ हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते.

Crime News
Shocking News: 'माझ्या बॉससोबत शारीरिक संबंध ठेव नाहीतर..' पतीकडून पत्नीचा छळ, सासरच्या मंडळींकडूनही त्रास

एएसपी नरेंद्र प्रताप सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासानंतर पोलिसांनी आरोपी अक्षयला पाच महिन्यांनी अटक केली आहे. त्याने चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com