'दम मारो दम' राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता नशा करण्यात दंग, 'तो' व्हिडिओ व्हायरल

NCP Leader Baba Jagtap: माढा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष बाबा जगताप नशा करतानाचा व्हिडिओ व्हायरल. अवैध मुरूम उत्खनन प्रकरणानंतर पुन्हा एकदा वादात. अजित पवार–अंजना कृष्णा फोन प्रकरणामुळे आधीच चर्चेत.
NCP Leader Baba Jagtap
NCP Leader Baba JagtapSaam
Published On
Summary
  • माढा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष बाबा जगताप नशा करतानाचा व्हिडिओ व्हायरल

  • अवैध मुरूम उत्खनन प्रकरणानंतर पुन्हा एकदा वादात

  • अजित पवार–अंजना कृष्णा फोन प्रकरणामुळे आधीच चर्चेत

  • नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त, कारवाईची मागणी जोर धरत

सोलापूरच्या माढा तालुक्यातील राजकारण पुन्हा एकदा गाजत आहे. अवैध मुरूमांचे उत्खनन प्रकरणी चर्चेत आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बाबा जगताप यांचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. यांचा एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये बाबा जगताप आपल्या कार्यालयात बसून अंमली पदार्थांचे सेवन करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातील मोबाईल संभाषणचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणावरून अजित पवारांनी ट्विट केलं होतं. या प्रकरणाच्या केंद्रस्थानी असलेल्या बाबा जगताप या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या नव्या व्हायरल व्हिडिओमुळे आणखी अडचणी वाढल्या आहेत.

NCP Leader Baba Jagtap
'निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी...' गणेश गल्ली, तेजुकाया अन्.. मुंबईतील गणरायाच्या विसर्जनाला सुरूवात

कुर्डू येथे बेकायदेशीर मुरूम उत्खनन थांबवण्यासाठी कारवाईस गेलेल्या आयपीएस अंजना कृष्णा यांना अजित पवार यांनी फोनवरून थांबवण्याच्या सूचना दिल्याचा आरोप झाला होता. त्यावेळी अजित पवार यांना फोन लावून देणारे व्यक्ती म्हणजे बाबा जगताप. अजित पवारांनी फोनद्वारे महिला पोलीस अधिकाऱ्याला तंबी दिली होती. आता बाबा जगताप यांचा व्हिडिओ समोर आला आहे.

NCP Leader Baba Jagtap
नरेंद्र मोदींना आईवरून शिवीगाळ; भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, त्या रात्री नेमकं काय घडलं?

त्यांचा नशेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर बाबा जगताप यांच्यावर कारवाईची मागणी जोर धरत आहे. या घडामोडींमुळे मोठे राजकीय नुकसान होण्याची शक्यता आहे.

NCP Leader Baba Jagtap
मोठी बातमी! मुंबईत वेश्या व्यवसायाचा भंडाफोड; पोलिसांनी अभिनेत्रीला रंगेहाथ पकडलं, २ अभिनेत्रींची सुटका

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com