Farooq Abdulla Saam Tv
देश विदेश

Farooq Abdullah : माजी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील कारचा अपघात, २ पोलीस कर्मचारी जखमी

farooq abdullah convoy accident : माजी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील कारचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात २ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. या अपघातानंतर काही क्षणासाठी एकच खळबळ उडाली होती.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांच्या ताफ्यातील एका कारचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दिल्ली पोलिसांचे हेड कॉन्स्टेबल जखमी झाले. माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला हे आज दिल्लीतून अजमेर जियारतसाठी निघाले होते. दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसदरम्यान हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.

फारुक यांच्या ताफ्यातील दिल्ली पोलिसांच्या कारचा अपघात झाला. भांडारेज इंटरचेंजजवळ ताफ्यातील कारचा अपघात झाला. ताफ्यातील कारच्या समोर अचानक गाय समोर आली. त्यामुळे अपघात झाला. या अपघातात दिल्ली पोलिसांच्या कारचं मोठं नुकसान झालं आहे. दिल्ली पोलिसांची कारचे एअरबॅग्स बाहेर आले. त्यामुळे दोघांचा जीव थोडक्यात बचावला.

ताफ्यातील कारचा झालेल्या अपघातात दिल्ली पोलिासांच्या दोन जवान जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दोघे किरकोळ जखमी झाल्याने त्यांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. या अपघातामुळे व्हीआयपी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या संपूर्ण घटनेत भारतीय राजमार्ग व्यवस्थेचा निष्काळजीपणा समोर आला आहे.

दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवर सारख्या सुरक्षित एक्स्प्रेसवेवर अचानक गाय आल्यानं अपघात झाला. त्यामुळे व्यवस्थेच्या कामकाजावर सवाल उपस्थित करण्यात येत आहे. तसेच एक्स्प्रेसच्या असुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेत राष्ट्रीय राजमार्ग व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. एक्स्प्रेस सुरक्षित असल्याचाही दावा फोल ठरल्याचं बोललं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिवाळीत बोनसऐवजी दिली सोनपापडी; कामगार भडकले, कंपनीच्या गेटवरच डबे फेकले, Video Viral

Weather Update: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पावसाची जोरदार बॅटिंग; कोकणासह पश्चिम महाराष्ट्रासाठी पुढचे ३ तास महत्वाचे

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण नव्हे तर ‘लाडके भाऊ’ योजना; 2400 सरकारी कर्मचाऱ्यांनीही लाटले पैसे, VIDEO

Kalyan : कुटुंबीय दिवाळी साजरी करण्यात गुंग; अचानक भलंमोठं झाड ३ घरावर कोसळलं, कल्याणमधील घटना

Maharashtra Live News Update: कोकणासह पश्चिम महाराष्ट्रासाठी पुढचे ३ तास महत्वाचे,हवामान विभागाचा इशारा

SCROLL FOR NEXT