Pune -Nashik Highway Accident: पुणे-नाशिक महामार्गावर ३ वाहनांचा विचित्र अपघात, ९ जण जागीच ठार

Narayangaon Accident News: पुणे- नाशिक महामार्गावर नारायणगावजवळ भीषण अपघात झाला. ३ वाहनांमध्ये हा अपघात झाला असून ९ जणांचा जागीच मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. अपघाताचा तपास पोलिस करत आहेत.
Pune -Nashik Highway Accident: पुणे-नाशिक महामार्गावर ३ वाहनांचा विचित्र अपघात, ९ जण जागीच ठार
Pune Accident Saam Tv
Published On

रोहिदास गाडगे, राजगुरूनगर

पुणे जिल्ह्यातल्या नारायणगावमध्ये ३ वाहनांना भीषण अपघात झाला आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्स ऑटो गाडीला पाठीमागून आयशर टेम्पोने जोरदार धडक दिली. ही मॅक्स ऑटो एसटी बसवर फेकली गेली. या अपघातामध्ये ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात झालाय. या अपघातामध्ये ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. नारायणगावजवळ आज सकाळी १० वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्स ऑटो गाडीला पाठीमागून आयशर टेम्पोने जोराची धडक दिली. चेंडूप्रमाणे ही मॅक्स ऑटो फेकली गेली. पुढं एक ब्रेक फेल झालेली एसटी रस्त्याच्या बाजूला उभी होती. त्या एसटीवर ही मॅक्स ऑटो जाऊन आपटली.

Pune -Nashik Highway Accident: पुणे-नाशिक महामार्गावर ३ वाहनांचा विचित्र अपघात, ९ जण जागीच ठार
Milk Tanker Accident: शिंदवणे घाटात दुधाच्या टँकरचा अपघात; चालकाचा जागीच मृत्यू, एकजण गंभीर

या अपघातामध्ये ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये चार महिला, चार पुरुष आणि एका बाळाचा समावेश आहे. इतर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. नाशिकहून पुण्याच्या दिशेला येताना हा अपघात झाला. अपघातामध्ये मृत्यू झालेले सर्वजण हे मॅक्स ऑटो गाडीतील आहेत. हे सर्वजण आसपासच्या गावातील आहेत. जखमी प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींची प्रकृती गंभीर आहे.

Pune -Nashik Highway Accident: पुणे-नाशिक महामार्गावर ३ वाहनांचा विचित्र अपघात, ९ जण जागीच ठार
Pune Accident Update: २५ वाहनांना उडवून कंटेनरवाला सुस्साट सुटला; रस्त्यावर सिनेस्टाइल पाठलागाचा थरार, लोकांनी केबिनबाहेर ओढून कुटला! VIDEO

अपघातातील मृतांची नावं -

१) देबुबाई दामू टाकळकर - (वय ६५ वर्ष), राहणार - वैशखखेडे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे

२) विनोद केरूभाऊ रोकडे - (५० वर्षे) राहणार - कांदळी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे

३) युवराज महादेव वाव्हळ -(२३ वर्षे) राहणार - 14 नंबर कांदळी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे

४) चंद्रकांत कारभारी गुंजाळ -(५७ वर्षे) राहणार - कांदळी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे

५) गीता बाबुराव गवारे -( ४५ वर्षे) राहणार - 14 नंबर कांदळी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे

६) भाऊ रभाजी बडे - (६५ वर्षे) राहणार - नगदवाडी कांदळी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे

७) नजमा अहमद हनीफ शेख - (३५ वर्षे) राहणार - गडही मैदान, खेड राजगुरुनगर

८) वशिफा वशिम इनामदार - (५ वर्षे)

९) मनीषा नानासाहेब पाचरणे - (३६ वर्षे) राहणार - 14 नंबर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे

Pune -Nashik Highway Accident: पुणे-नाशिक महामार्गावर ३ वाहनांचा विचित्र अपघात, ९ जण जागीच ठार
Sambhajinagar Accident: साईबाबांच्या दर्शनाची इच्छा अपूर्ण राहिली! शिर्डीला पोहचण्यापूर्वीच काळाचा घाला, 3 भाविकांचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com