Milk Tanker Accident: शिंदवणे घाटात दुधाच्या टँकरचा अपघात; चालकाचा जागीच मृत्यू, एकजण गंभीर

Milk Tanker Accident in Ghat: उरुळी कांचन - जेजुरी मार्गावरील शिंदवणे घाटात दुधाच्या टँकरचा भीषण अपघात घडलाय. वळणावर चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात घडल्याची माहिती आहे.
Milk tanker accident
Milk tanker accidentSaam Tv News
Published On

उरुळी कांचन - जेजुरी मार्गावरील शिंदवणे घाटात दुधाच्या टँकरचा भीषण अपघात घडलाय. वळणावर चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात घडल्याची माहिती आहे. या अपघातात टँकर चालकाचा जागीच मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला असल्याची माहिती समोर आलीय. ही धक्कादायक घटना गुरूवारी सांयकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडलीय.

कुंवर पाल (वय वर्षा ३५, बरेली उत्तरप्रदेश) असे अपघातात मृत झालेल्या चालकाचे नाव आहे. तर वैभव शिवाजी जामदार (वय वर्ष ३४ बेलवाडी, इंदापूर) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार सुदर्शन धनराज माने यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मृत चालक कुंवर पाल याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Milk tanker accident
Sangli crime news: आधी कारच्या काचा फोडल्या, नंतर तलवारीने सपासप वार; पैलवानाच्या हत्येने सांगलीत खळबळ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी वाघापूरजवळील उरुळी कांचनकडे दुधाचा टँकर निघाला होता. यावेळी उरुळी कांचनजवळ असलेल्या शिंदवणे घाटात, तीव्र वळण लागले. या तीव्र वळणावर चालक कुंवर पाल याचे टँकरवरील नियंत्रण सुटले. ज्यामुळे टँकर थेट कठडा तोडून थेट २० फुट खाली कोसळला.

Milk tanker accident
Shahrukh Khan: बॉलिवूड हादरलं! सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोराने शाहरूख खानच्याही घराची केली रेकी

या अपघातात चालक कुंवर पाल आणि त्याच्याशेजारी बसलेले रूट सुपर वायझर हे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका, उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक प्रविण कांबळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक रमेश भोसले, हवालदार सुदर्शन माने आणि स्थानिक नागरिकांनी दोघांना उरुळी कांचन येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले.

मात्र उपचारापूर्वीच चालक कुंवर पाल याचे मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. दरम्यान, या अपघातात वैभव जामदार हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. त्याची प्रकृती नाजूक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com