fire breaks out in engine of a passenger train, narkatiaganj, bhelwa, bihar.  saam tv
देश विदेश

भेलवा स्थानकाजवळ रेल्वेच्या इंजिननं घेतला पेट; प्रवासी सुरक्षित (व्हिडिओ पाहा)

ही घटना घडताच रेल्वेमधून प्रवास करणारे सर्व प्रवासी खाली उतरविण्यात आले.

साम न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : बिहारमधील (bhiar) भेलवा रेल्वे स्थानकाजवळ (bhelwa railway station) डीएमयू रेल्वेच्या (railway) इंजिनमध्ये आज (रविवार) आग (Fire) लागली. ही रेल्वे रक्सौलहून नरकटियागंजला (narkatiaganj) जात होती. पहाटे ५.२५ वाजता ही घटना घडली. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या रेल्वेचा लागलेली आग विझवण्याचे काम सुरू आहे.

ही रेल्वे भेलवा स्टेशनला पोहोचणार होती. त्यापुर्वी सिग्नलवर थांबली हाेती. डीपीसी (डिझेल ईएमयू ड्रायव्हिंग पॉवर कार) च्या मागील भागातून धूर निघताना गार्डला दिसला. धूर आणि आग पाहून गाडी भेलवा स्थानकापूर्वीच थांबविण्यात आली.

ही घटना घडताच रेल्वेमधून प्रवास करणारे सर्व प्रवासी खाली उतरविण्यात आले. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही असे रेल्वे विभागाकडून कळविण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बोरिवली पूर्वेतील एसआरए प्रकल्पात भीषण आग

Dhiraj Deshmukh: माजी मुख्यमंत्र्यांच्या धाकट्या मुलाचं शिक्षण किती?

Badlapur : बदलापुरातील भोज धरणातील बंधाऱ्यावर तरुणाचा जीवाशी खेळ | VIDEO

Nagpur Crime: नागरपूरच्या लक्झरी हॉटेलमध्ये देहविक्रीचा नंगानाच, परदेशी तरूणीकडून 'नको ते कृत्य' पोलिसांची रेड अन्..

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी का सोडतात?

SCROLL FOR NEXT