जयंत पाटलांनी राज्यपालांचे या कारणासाठी केले अभिनंदन, म्हणाले...

विधानसभेच्या दोनदिवसीय विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात विश्वासदर्शक ठराव आणि विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे.
Jayant Patil Latest Marathi News, MLC Election News,
Jayant Patil Latest Marathi News, MLC Election News, Saam Tv

रश्मी पुराणिक

मुंबई: विधानसभेच्या दोनदिवसीय विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात विश्वासदर्शक ठराव आणि विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल नार्वेकर, तर शिवसेनेचे राजन साळवी यांच्यात लढत होणार आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच माजी मंत्री जयंत पाटील यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे अभिनंदन केले.

आम्ही अनेकदा सांगितले अध्यक्ष निवडणूक घ्या. पण राज्यपाल यांनी काही मनावर घेतले नाही. त्यांनी आमची विनंती मान्य केली नाही. ते कशाची वाट पाहत होते ते आम्हाला आता कळाले. आधीच सांगितले असते तर एकनाथ शिंदे आधीच केले असते. आता राज्यपाल यांनी आम्ही पाठवलेल्या बारा नावांच्या यादीला मान्यता द्यावी मग आम्ही समजू राज्यपाल समान वागले, असंही जयंत पाटील म्हणाले.

Jayant Patil Latest Marathi News, MLC Election News,
मुंबईवर अतिरेकी हल्ला झाल्यासारखी बंडखोरांना सुरक्षा; संजय राऊतांचा हल्लाबोल

आम्ही अनेकदा सांगितले अध्यक्ष निवडणूक घ्या. पण राज्यपाल यांनी काही मनावर घेतले नाही. त्यांनी आमची विनंती मान्य केली नाही. ते कशाची वाट पाहत होते ते आम्हाला आता कळाले. आधीच सांगितले असते तर एकनाथ शिंदे आधीच केले असते. आता राज्यपाल यांनी आम्ही पाठवलेल्या बारा नावांच्या यादीला मान्यता द्यावी मग आम्ही समजू राज्यपाल समान वागले, असंही जयंत पाटील म्हणाले.

जयंत पाटील यांच्यानंतर लगेच देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते नाना पटोले यांचे आभार मानले. ते आमचे मित्र आहेत. त्यांच्यामुळेच हे सगळे झाले, असंही फडणवीस म्हणाले. नाना पटोले यांनी जर पद सोडले नसते तर आम्हाला हा दिवस बघायला मिळाले नसता, असंही जयंत पाटील म्हणाले.

Jayant Patil Latest Marathi News, MLC Election News,
Eknath Shinde Latest News: शिवसेना पक्ष आमचाच, एकनाथ शिंदेंनी बजावला व्हीप!

शिवसेना पक्ष आमचाच, एकनाथ शिंदेंनी बजावला व्हीप!

शिवसेनेने (ShivSena) काल सर्व आमदारांना विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी व्हीप जारी केला आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक थोड्याच वेळात पार पडणार आहे. आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटानेही सर्व आमदारांना व्हीप जारी केला आहे. हा व्हीप शिवसेनेच्या लेटरपॅडवर बजावला आहे, यात राहुल नार्वेकर यांना विजयी करा असा आदेश देण्यात आला आहे. काल शिवसेनेने व्हीप बजावला होता, या व्हीपमध्ये राजन साळवी यांना विजयी करण्याचे आदेश दिले आहेत.

शिवसेनेचे सर्व बंडखोर आमदार काल गोव्यातून मुंबईत आले आहेत. आज विधानसभा अध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. यासाठी एकनाथ गटाकडून आज तर शिवसेनेकडून काल व्हीप जारी केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com