Eknath Shinde Latest News: शिवसेना पक्ष आमचाच, एकनाथ शिंदेंनी बजावला व्हीप!

आज विधान सभेत अध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे.
Maharashtra Political Crisis| Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
Maharashtra Political Crisis| Uddhav Thackeray Vs Eknath ShindeSaam TV

मुंबई: शिवसेनेने (ShivSena) काल सर्व आमदारांना विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी व्हीप जारी केला आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक थोड्याच वेळात पार पडणार आहे. आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटानेही सर्व आमदारांना व्हीप जारी केला आहे. हा व्हीप शिवसेनेच्या लेटरपॅडवर बजावला आहे, यात राहुल नार्वेकर यांना विजयी करा असा आदेश देण्यात आला आहे. काल शिवसेनेने व्हीप बजावला होता, या व्हीपमध्ये राजन साळवी यांना विजयी करण्याचे आदेश दिले आहेत.

शिवसेनेचे सर्व बंडखोर आमदार काल गोव्यातून मुंबईत आले आहेत. आज विधानसभा अध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. यासाठी एकनाथ गटाकडून आज तर शिवसेनेकडून काल व्हीप जारी केला आहे.

Maharashtra Political Crisis| Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
मोठी बातमी : एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदारांना व्हिप बजावणार, सचिन अहिरांचा इशारा

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ही पहिलीच कसोटी असणार आहे. यासाठी शिंदे गटासह भाजपनेही मोठी तयारी केली आहे. शिंदे गटाकून जारी करण्यात आलेल्या व्हीपमध्ये भाजपचे नेते राहुल नार्वेकर हे शिवसेना आणि भाजपचे अधिकृत उमेदवार असणार आहेत, त्यांनाच विजयी करण्याचे आदेश या व्हीपमध्ये दिले आहेत. या आदेशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजूनही गटनेते म्हणून नमुद आहे.

Maharashtra Political Crisis| Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
मोठी बातमी! माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर शिवसेनेची मोठी कारवाई

व्हीपमध्ये काय आहे?

आजपासून विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरू होणार असून, पहिल्याच दिवशी अध्यक्षपदाची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी सरकारच्या वतीने ऍड. राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आलेली असून, या निवडणुकीत त्यांनाच मत देण्यासाठी शिवसेना पक्षाने आपले सर्व आमदार तसेच सहयोगी आमदारांना व्हीप बजावला आहे. हा व्हीप पक्षाच्या उर्वरित १६ आमदाराना देखील लागू असेल. व्हीपची प्रत ह्या सन्माननीय आमदार महोदयांना देखील पाठवण्यात आलेली आहे.

दरम्यान, आता अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नेमक काय होते हे पाहणे महत्वाचे ठऱणार आहे. अध्यक्ष पदाची निवडणुकीत महाविकास आघाडीने जोर लावला आहे, तर भाजप आणि शिंदे गटानेही पूर्ण ताकत लावली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com