chief minister Eknath Shinde Group
chief minister Eknath Shinde GroupSaam TV

मोठी बातमी : एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदारांना व्हिप बजावणार, सचिन अहिरांचा इशारा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या नेतेपदावरुन हकालपट्टी केलीय.
Published on

मुंबई : महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस नवनिर्वाचीत सरकार स्थापन झाल्यानंतर (uddhav Thackeray) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेनेच्या नेतेपदावरुन हकालपट्टी केली. त्यानंतर राजकीय वातावरण तापलं आणि शिवसेना नेमकी कुणाची ? हा सवाल उपस्थित झाला. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर (Sachin Ahir) यांनीही शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदे यांसह सर्व बंडखोर आमदारांना पक्षप्रतोद सुनिल प्रभू व्हिप बजावणार आहेत. शिवसेना (Shivsena) आणि एकनाथ शिंदे गटाची कायदेशीर लढाई कोर्टात सुरूच राहणार आहे, अशी प्रतिक्रिया अहिर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

chief minister Eknath Shinde Group
डोंबिवलीत 272 किलो गांजा जप्त, दोन आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

तसंच माध्यमांशी बोलताना अहिर पुढे म्हणाले, शिवसेना पक्षसंघटन अधिक मजबुत करण्यासाठी शिवसेनेची आज बैठक झाली. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना आक्रमक भूमिका घेणार आहे. शिवसेना संघटन अधिक जोमानं उभं करणार आहोत. विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी पक्षप्रतोद सुनिल प्रभू सर्व आमदारांना व्हीप बजावणार आहेत. एकनाथ शिंदे यांसह सर्व बंडखोर आमदारांना व्हिप बजावले जाणार आहे.

chief minister Eknath Shinde Group
Latur : कोरोनाचा धोका कायम; बूस्टर डोसकडे ज्येष्ठ नागरिकांनी फिरवली पाठ

एकनाथ शिंदे यांसह शिवसेनेच्या ३९ आमदारांनी बंडाचा झेंडा फडकावल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. एकनाथ शिंदे यांनी ३० जूनला राजभवनात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मविआ आणि एकनाथ शिंदे गटातील सत्तासंघर्षाला पूर्णविराम लागला. देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदासाठी शपथ घेतली. त्यानंतर महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस नवनिर्वाचीत सरकारचा उदय झाला.

Edited By - Naresh shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com