Latur : कोरोनाचा धोका कायम; बूस्टर डोसकडे ज्येष्ठ नागरिकांनी फिरवली पाठ

लातूर जिल्ह्यातील ६० वर्षापुढील २ लाख ७४ हजार ५३७ जणांची निर्धारीत वेळ संपलेली असतानाही बुस्टर डोस घेतला नसल्याचे उघड झाले आहे.
Covid news
Covid news saam tv

लातूर : कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या लाटेनंतर लातूर (Latur) जिल्ह्यातील कोरोनाची तीव्रता कमी झाली आहे. तरी जिल्ह्यात काही नागरिकांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. मात्र, तरीही कोरोना (Corona) प्रतिबंधात्मक लसीकरणाकडे नागरिकांकडून पाठ फिरवली जात आहे.तसेच जिल्ह्यातील ६० वर्षांपुढील २ लाख ७४ हजार ५३७ जणांची निर्धारीत वेळ संपलेली असतानाही बुस्टर डोस घेतला नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आता आरोग्य विभागाने 'हर घर दस्तक' ही मोहीम सुरू केली आहे. ( Latur Corona Update News In Marathi )

Covid news
प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी भारतीयांनी खाल्ले ३ लाख टन काजू, सणासुदीला वाढेल अधिक भाव!

लातूर जिल्ह्यात मार्च २०२२ नंतर दोन-अडीच महिने कोरोनाबाधित रुग्ण नव्हते. आता कोरोना पुन्हा जिल्ह्यात पाय पसरू लागला आहे. त्यामुळे सर्वच यंत्रणा पुन्हा कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या कामाला लागली आहे. त्यात शंभर टक्के लसीकरणाला प्राधान्य दिले जात आहे. ४५ वर्षे वयापुढील गटात ७ लाख ७८ हजार ८०० व्यक्तींपैकी ६ लाख ५६ हजार ८०३ जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर ४५ वर्षांपुढील ७ लाख ७८ हजार ८०० पैकी ५ लाख ६० हजार ८३ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. त्याचं प्रमाण ७२ टक्के आहे. जिल्ह्यात कोरोना पुन्हा डोके वर काढत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने 'हर घर दस्तक' ही मोहीम सुरू केली आहे. त्यासाठी घरोघरी जाऊन लस न घेतलेल्यांची यादी तयार केली जात आहे. त्यांना अंगणवाडी तसेच शाळांमध्ये जाऊन लस देण्याचे नियोजन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Covid news
Pune | भारतीय कुस्ती संघटनेचा निर्णय, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त | Maharashtra

दरम्यान, जिल्ह्यात विशेष करुन १२ ते १४, १५ ते १७ या वयोगटात लसीकणावर भर देण्यात आला आहे. जिल्ह्यातील आरोग्य विभागातील कर्मचारी, अंगणवाडी मदतनीस, आशा कार्यकर्ती यांच्यामार्फत 'हर घर दस्तक' मोहिमेअंतर्गत लस न घेतलेल्यांची यादी करण्याचे काम जिल्ह्यात सुरू आहे. ज्यांनी लस घेतली नाही त्यांना घरी जाऊन लस देण्यात येत आहे. जून महिन्यापासून ही मोहीम सुरू झाली आहे. १२ ते १४ आणि १५ ते १७ वयोगटात ज्यांनी लस घेतली नाही त्यांची यादी तयार करुन नजीकच्या अंगणवाडी किंवा शाळेत जाऊन लस देण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com